सोलापुरी चादर ही भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर शहरात बनवली जाणारी सुती चादर आहे.[] या चादरी भारतात लोकप्रिय आहेत. या चादरी हातमागाचा वापरून तयार केल्या जातात आणि त्यांच्या डिझाइन आणि टिकाऊपणासाठी ओळखल्या जातात.[] जिओग्राफिकल इंडिकेशन (GI) दर्जा प्राप्त करणारे सोलापुरी चादर हे महाराष्ट्रातील पहिले उत्पादन आहे.[]

सोलापूरी चादर

इतिहास

संपादन

सोलापूर हे कापड उद्योगासाठी ओळखले जाते. एकेकाळी आशियातील सर्वात मोठी सूतगिरणी होती.[] सोलापुरात हातमाग विणकाम उद्योगाचा विकास पेशव्यांच्या राजवटीत सुरू झालेला दिसतो.[] उद्योगात असंख्य छोटे स्वतंत्र कारागीर विणकर होते. प्रत्येक कारागीर-घरात एक किंवा दोन यंत्रमाग होते जे सामान्यतः कुटुंबप्रमुख हाताळत असत. कुटुंब हे कामाचे एकक होते आणि स्त्रिया व मुले विणकराला पूर्वतयारी प्रक्रियेत आणि काही बाबतीत रंगरंगोटीमध्येही मदत करत. १९७० च्या दशकात भारतातील आधुनिक कारखान्याच्या उदयाने स्थानिक हातमाग विणकाम उद्योगाची संघटना बदलली.[]

१९५० च्या दशकात सोलापूरमध्ये आल्यापासून ते दक्षिण भारतातील पद्मशाली विणकरांनी तयार केले आहेत. सोलापूर जिल्ह्यात अनेक कंपन्या चादर तयार करतात.

निर्यात

संपादन

महाराष्ट्राव्यतिरिक्त, सोलापुरी चादरला भारतातील कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानमध्ये मागणी आहे.

विदेशातही संयुक्त अरब अमिराती, कुवेत, दक्षिण आफ्रिका, युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंग्डम आणि कॅनडा या देशांत सोलापूर चादरीला भरपूर मागणी आहे.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ a b "TOI".
  2. ^ a b c "The Gazetteers Department - SOLAPUR". web.archive.org. 2015-07-09. रोजी मूळ पानापासून संग्रहित2015-07-09. 2022-01-07 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  3. ^ "कोल्हापुरी मसाल्याला 'GI'ची फोडणी". महाराष्ट्र टाइम्स. 2022-01-07 रोजी पाहिले.
  4. ^ "Saptahik Sakal - Online weekly from Sakaal Media Group - Pune". web.archive.org. 2015-07-07. 2015-07-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-01-07 रोजी पाहिले.