सोलर कुलर
उन्हाळ्यात गरम होत असते, थंड हवेची गरज असते. परंतु पंखा चालवणे हा उपाय असला तरी लोड शेडिंग असल्याने उन्हाळ्यात बहुधा लाईट जास्तवेळ नसते. अशावेळी काय करायचे, म्हणून सूर्याच्या प्रकाशावर ऊर्जा निर्माण करून त्या ऊर्जेवर पंखा चालवणे हा उपाय होऊ शकतो.[१]
महत्त्व व गरज
संपादनसोलर कूलरमुळे लाइटची बचत होऊन माणसांची गरज भागवली जाते. त्यामुळे पैशांची बचत होते. या कूलरचे आकारमान छोटे असल्याने तो कुठेही राहू शकतो. या कूलरमध्ये वापरलेले सोलर पॅनल दीर्घकाळ टिकवल्याने DC सप्लाय मिळतो. यामध्ये पूर्ण पात सर्किट असल्याने तो कूलरचा स्पीड कंट्रोल करू शकतो. यामध्ये पाण्याची बचत होते. या सर्व दृष्टीने सोलर कूलर महत्त्वाचा व गरजेचा वाटतो.
उद्दिष्ट हा टेबल सोलर कूलर असल्याने दोन ते तीन माणसांना हवा देऊ शकतो. कमी खर्चात हा कूलर बनतो. याची क्षमता दीर्घकाळ टिकू शकते. सोलरवर असल्याने याला इलेक्ट्रिक सप्लायची गरज भासत नाही. कूलर मधील पाणी सर्क्युलेट झाल्याने वाऱ्याच्या वेगावर थंड होऊन हवा थंड करण्याचे काम करते.
सोलर कूलर बनविण्याची कृती
संपादनप्रथम अंदाजपत्रकानुसार साहित्य आणून त्यांची माहिती घेतली. डिझाईननुसार साहित्य वेगवेगळे केले.
सर्किट बनविणे :
सर्किटवर डिझाईननुसार काँपोनंट लावले व सोल्डरिंग गनने सोल्डर केले. त्यातून १८ Voltageच्या सोलर पॅनलमधून दोन सप्लाय घेतले. १८Voltage सोलर पॅनल मधून १२Voltage out put व १८Voltage out put घेतले. अशाप्रकारे सर्किट वर १२Voltage पाॅवर कमी जास्त करण्याची १० kचा रेग्युलेटरपण सोल्डर केला. रेग्युलेटर गरम होऊ नये म्हणून त्यावर हीट शील्ड लावले. त्यामुळे रेग्युलेटरमधील उष्णता विभागली जाईल अशाप्रकारे सोलर सर्किट तयार झाले.
सर्किट मधील अडचण :
(१)12Vचा DC पंप जास्त Amper पाॅवर घेते त्यामुळे 12V DC पंखा कमी Ampere घेत असल्याने स्पीड कमी आहे. कारण : 12V DC मोटार कमी स्पीड व जास्त Ampereची असल्याने ही अडचण समजते. (१)12V DC पंखा हा 0.15 Ampereचा असल्याने स्पीड कमी देतो.
लेझर कटरचा उपयोग :
सर्किट सुरक्षतेसाठी लेझर कटरवर प्रेस फिटचा बॉक्स बनवला. त्यामध्ये बटन प्रिन्स, सॉकेट्ससाठी जागा ठेवली. व त्यामध्ये सर्किट बनवून बॉक्स फैट केला. व हा बॉक्स कूलरमध्ये बसवला.
सोलर कूलरचे फॅब्रिकेशन :
सोलर कूलरची पूर्ण बॉडी L अँगलपासून मापाने डिझाईन अनुसार बनवली.
सोलर कूल्ररचा कूलिंग सेट तयार करणे :
L ॲगलच्या बॉडीवरून व त्याच्या आतील भागावरून मोजून कूलिंग सेटची मापे काढून त्यावर वेल्डमेस जाळी कट करून ती काटकोनात वळवली. त्यावर नारळाचा काथ्या लावून हवा आत येईल अशी पारदर्शकता ठेवली. त्यावर बारीक जाळी लाऊन ती कूलिंग होण्यासाठी ड्रिपर लाईन बसवली व तो पूर्ण सेट लाकडी पट्टीने फिट केला. अशा प्रकारे कूलिंग सेट तयार झाला.
कूलरमध्ये सर्किट सेट करणे
संपादनकूलिंग सेटच्या पाईपलाईनला 12 Vची DC पंप सेट केला. त्यानतंर सर्किट कूलरला बसवून त्याचे 12V DC पंप व 12V DC पंख्याचे कनेक्शन सर्किटला करून त्यातून दोन स्विच व एक स्पीड कंट्रोलचे कनेक्शन घेतले. यामुळे सर्किटमध्ये काही अडचण निर्माण झाली. व तो पॅरलरमध्ये जोडला असल्याने एक स्विच फक्त पंखा चालवेल. व दुसरे स्विच मोटार चालू करेल. जेव्हा सूर्यप्रकाश कमी असेल तेव्हा कोणताही एकाच पंखा /पंप चालू राहील हा या बटनांचा फायदा होईल.
स्पीड कंट्रोलने पंख्याचा स्पीड नियंत्रित करता येईल. यामुळे येथे 10 K POT(?) लावला आहे. कूलरच्या वरील भागामधून पाणी ओतण्यासाठी जागा ठेवली आहे. अशा प्रकारे हा आपण टेबलवर काम करत असूनही हा आपली थंड हवेची इच्छा पूर्ण करू शकतो. याला कलर करून कूलर तयार झाला.[२]
सोलर कूलरचे फायदे
संपादन- हा कूलर सोलरवर असल्याने तो लाईट नसतानाही थंड हवा देऊ शकतो.
- हा साईजने छोटा आहे म्हणून कोणत्याही ठिकाणी रारू शकतो.
- याचे मटेरियल जास्त काळ टिकू शकते.
- लाईट बिलची बचत होते.
- सोलर पॅनल असल्याने हा जास्त काळ टिकवून राहू शकतो.[३]
संदर्भ
संपादन- ^ "How does solar cooking work?". www.solarcooker-at-cantinawest.com. 2019-06-29 रोजी पाहिले.
- ^ "Solar Cookers — Vikaspedia". vikaspedia.in. 2019-06-29 रोजी पाहिले.
- ^ "Solar Cooker | Gujarat Energy Development Agency". geda.gujarat.gov.in. 2019-06-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-06-29 रोजी पाहिले.