सोलंग एतोर हा भारत देशाच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील आदी जनजातीचा उत्सव आहे.[] शेतीचा नवा हंगाम सुरू करण्यापूर्वी जनजाती सदस्य हा उत्सव साजरा करतात.[]

स्वरूप

संपादन

हा उत्सव एकूण पाच दिवस सुरू असतो. या दिवशी उत्सवाची पूर्वतयारी केली जाते. दुसऱ्या दिवशी पशुबळी दिला जातो.[] या उत्सवात सदस्य समूहाने मिळून तिसऱ्या दिवशी पाळीव प्राण्यांच्या आरोग्यासाठी देवतांना प्रार्थना करतात तसेच आपल्या वस्तीमध्ये खेड्यामध्ये समृद्धी नांदावी यासाठी प्रार्थना करतात.[] चौथा दिवस पुरुष सदस्य धनुष्य बाण आणि भाले तयार करण्यासाठी वेळ देतात. शेवटच्या दिवशी देवतांना शाही नैवेद्य अर्पण केले जातात. या विशिष्ट प्रसंगी उत्सवी नृत्य केले जाते.[]

लोकगीते

संपादन

या उत्सवात गायली जाणारी लोकगीते हे या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. दररोज संध्याकाळी मानवाची उत्पत्ती,पारणी, वनस्पती तसेच आदी जनजातीचे पूर्वज त्यांचे पराक्रमी वीर यांच्या विषयी माहिती या गाण्यांत असते.

चित्रदालन

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Culture & Heritage | District East Siang, Government of Arunachal Pradesh | India" (इंग्रजी भाषेत). 2022-06-10 रोजी पाहिले.
  2. ^ "Solung Etor celebrated with gaiety". Arunachal Observer (इंग्रजी भाषेत). 2019-05-15. 2022-06-10 रोजी पाहिले.
  3. ^ Lepcha, Irani Sonowal (2020-09-01). "Arunachal Pradesh: Harvest festival of Adi tribe, Solung, begins". EastMojo (इंग्रजी भाषेत). 2022-06-15 रोजी पाहिले.
  4. ^ Sachchidananda; Prasad, R. R. (1996). Encyclopaedic Profile of Indian Tribes (इंग्रजी भाषेत). Discovery Publishing House. ISBN 978-81-7141-298-3.
  5. ^ Tayeng, Obang (2003). Folk Tales of the Adis (इंग्रजी भाषेत). Mittal Publications. ISBN 978-81-7099-899-0.