सोन्नलग्गी सिद्धेश्वर देवालय
सोलापुरातील साखरपेठ येथे असलेले सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धराम सिद्धरामेशवरांचे जन्मस्थळ हे (सोन्नलग्गी) सिद्धेश्वर मंदिर (जुने मंदिर) या नावाने ओळखले जाते. सिद्धरामेश्वरांचे बालपण या वास्तूमध्ये गेले असल्यामुळे त्या वास्तुस अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आजही सिद्धरामेश्वरांवर भक्तांची गाढ श्रद्धा आहे,की या ठिकाणी जाऊन प्रार्थना, पूजा केल्यास भक्तांची शारीरिक आणि मानसिक त्रासातून सुटका होते.
इतिहास
संपादनइ.स.१२ व्या शतकात सोन्नलग्गी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सोलापुरात मुर्डी मुद्दगौडा नावाचे पाटील व त्यांची पत्नी सुग्गलदेवी हे दाम्पत्य राहत होते. त्यांना अपत्य नव्हते. एके दिवशी आचार्य व योगी (जगद्गुरू) श्री रेवणसिद्धेश्वर सोन्नलग्गी गावात आले. त्यांनी सुग्गलदेवीला पाहिले व एका वर्षात तुझ्या पोटी पुत्ररत्न जन्मास येणार आहे, असे भविष्य वर्तवुन तिला आशीर्वाद दिला. सुग्गलदेवी ६० वर्षांची वृद्ध असल्याने तिच्या पोटी मूल जन्मणे अशक्यप्राय वाटत होते. परंतु, इ.स. ११३० साली एक पुत्र जन्मले तेच सोलापूरचे सिद्धरामेश्वर या नावाने महाशिवयोगी म्हणून प्रसिद्ध पावले.[ संदर्भ हवा ]