सोनवेल
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. सोनवेलचे लॅटिन नाव 'इपोमोर पेस-चप्रय (Ipomoea pes-caprae)' असे आहे.
सोनवेल ही वनस्पती समुद्र किनारी अधिक प्रमाणात आढळून येते. ही वनस्पती भारत, अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, फिलिपिन्स,इ. देशात मिळते. भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ या राज्यात मुबलक प्रमाणात आढळते आणि पूर्व व पश्चिम घाटात सुद्धा सोनवेल सापडते.