सोन पापडी ही दक्षिण आशियातील एक लोकप्रिय मिठाई आहे. तिला सोन पापरी, शोमपापरी, सोहन पापडी, शोणपापडी किंवा पाटिसा असेही म्हणतात.[१] ही शक्यतो चौकोनी-आकाराची असते किंवा फ्लेक्स म्हणून दिली जाते. त्यात कुरकुरीत पोत असते. तसेच ही पारंपारिकपणे गुंडाळलेल्या कागदामध्ये विकली जाते. आधुनिक औद्योगिक उत्पादनामुळे ती घट्ट तयार केलेल्या क्यूब्सच्या स्वरूपात विकले जात आहे.[२]

सोनपापडी. चित्र: २००१

साहित्य संपादन

साखर, बेसन, मैदा, तूप, दूध आणि वेलची हे त्याचे मुख्य घटक आहेत.

लोकप्रियता संपादन

 
इतर भारतीय मिठायांंसोबत सोनपापडी

सण आणि उत्सवांमध्ये सोनपापडी ही पहिली पसंती असते. विशेषतः दिवाळीमध्ये सोनपापडी प्रचंड प्रमाणात विकली जाते. [३]

ही मिठाई सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्रात तयार होऊन नंतर भारताच्या अनेक भागात पोहोचल्याचे सांगितले जाते. तर काही लोक उत्तर प्रदेश राज्यात ती तयार झाल्याची कथा सांगतात. पश्चिम बंगाल, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये ही मिठाई अतिशय लोकप्रिय आहे.[३]

सोनपापडी ही तुर्की मिठाई पिस्मानीसह जगातील अनेक प्रसिद्ध मिठाईंसारखीच आहे. तुर्कस्तानमध्ये 'पिसमनीये' खूप प्रसिद्ध आहे. हे भाजलेले पीठ आणि लोणी, साखर आणि पिस्ते यांचे सजवून तयार केले जाते. तर सोनपापडीमध्ये भाजलेले बेसन आणि खरबुजाचे दाणे मिसळले जातात.

तसेच सोनपापडी ही 'पतीसा' नावाच्या प्राचीन मिठाईची बहीण असल्याचे म्हटले जाते. पतीसा आणि सोनपापडीमध्ये फरक एवढाच आहे की, पाटिसा थोडा कडक असते, तर सोनपापडी पूर्णपणे विरघळते.[३]

हे देखील पहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "Soan Papdi [Food-India.com]". www.food-india.com. 2022-01-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Soan Papdi [Food-India.com]". www.food-india.com. 2022-01-07 रोजी पाहिले.
  3. ^ a b c "दिवाली पर सबसे ज़्यादा 'बांटी जाने वाली' सोन पापड़ी किस राज्य की देन है?". IndiaTimes (हिंदी भाषेत). 2021-11-04. 2022-01-07 रोजी पाहिले.