सॉक्रेटिस

(सॉक्रेटीस या पानावरून पुनर्निर्देशित)
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.

सॉक्रेटिस आणि त्याची प्रश्नांतून शिक्षणपद्धतसंपादन करा

[खालील लेख हा भाषांतरित आहे.][ अपूर्ण वाक्य]

 
सॉक्रेटीस ( इ. स. पू. सुमारे ४७०–३९९

सॉक्रेटिस हा एक थोर शिक्षक गणला जातो. त्याची शिक्षणपद्धत ही वेगळीच होती व तो प्रश्न विचारत-विचारत शिकवे व लोकांकडून उत्तरे मिळवे. "ex duco"चा अर्थ "lead out" होतो जो "education" ह्या शब्दाचा गाभा आहे. उत्तरे "मिळवणे" हे "lead out" किंवा त्यातूनच मार्ग दाखवणे अशा अर्थाने पाहिले तर अशा शिक्षणपद्धतीचे महत्त्व पटते.

शिष्योत्तमसंपादन करा

आज त्याच्या प्रश्नावलीबाबत आपल्याला जी माहिती आहे ती त्याच्या शिष्योत्तमामुळे. प्लॅटोऍरिस्टॉटल हे त्याचे शिष्य होते. व त्यांनी सॉक्रेटिसची ही प्रश्नावली लिहून ठेवल्यामुळेच ती आज जगाला माहीत आहे असे समजले जाते. त्याची विचार करण्याची पद्धत संवादाची होती.

सॉक्रेटिसचे सहा प्रकारचे प्रश्नसंपादन करा

सॉक्रेटिस सहा प्रकारचे प्रश्न विचारत असे. अशा प्रश्नांमुळे अनेकदा लोकांना सुरुवातीला त्याचा राग येत असे परंतु नंतर त्याचा फायदाही त्यांना होई. ह्या प्रश्नांचा उद्देश लोकांच्या माहितीच्या अचूकतेला व परिपूर्णतेला एक आव्हान असे व त्यातून तो लोकांना त्यांच्या अडचणीच्या अथवा उद्देशाच्या दिशेने मार्गदर्शन करीत असे.

संकल्पनात्मक स्पष्टीकरणासाठी प्रश्न:संपादन करा

ज्या लोकांना एखाद्या मुद्द्यावर चर्चा करायची आहे त्या मुद्द्याची त्यांच्यापाशीच कितपत एकवाक्यता आहे हे तो पाहत असे. त्यांना त्या मुद्द्यावर अधिक विचार करायला भाग पाडत असे. हे प्रश्न असे-

१. हे तुम्ही का म्हणताय


२. ...म्हणजे नक्की काय?

३. हे जे तुम्ही आता म्हणालाय ते आधीच्या मुद्द्याशी कसे लागू पडते?

४. ह्या मुद्द्याचे स्वरूप नेमके उलगडून सांगाल काय?

५. तुम्हाला ह्याबाबत आधीच काय काय माहीत आहे?

६. एखादे उदाहरण देऊ शकाल का?

७. तुम्ही हे .... म्हणताय की....?

८. कृपया हे जरा सोप्या पद्धतीने सांगाल का?

चौकशी प्रश्नसंपादन करा

लोकांनी गृहीत धरलेल्या बाबींवर अधिक खोलवर माहिती घेण्यासाठी हे प्रश्न तो विचारत असे. ह्याचा उपयोग त्यांच्या आधीच गृहीत धरलेल्या शक्यता व आजवर ज्या आंधळ्या विश्वासाबद्दल त्यांना कोणीही काहीही प्रश्न विचारलेले असतील तर ते विचारल्यामुळे वाद घालणाऱ्यांना तो त्यांच्या मुद्द्यावर अधिक विचार करावयास भाग पाडे.

१. आपण अजून काय काय शक्यता गृहीत धरू शकू?

२. तुम्ही हे गृहीत धरले आहे का?

३. तुम्ही ह्याच शक्यतांची निवड का केलीत?

४. ह्या ज्या शक्यता गृहीत धरल्या आहेत त्याची पडताळणी कशी करता येईल?

५. काय होऊ शकते जर आपण....?

मुद्द्याचा पाया, कारणं आणि पुरावे ह्यांना प्रोब करणे:संपादन करा

जेव्हा लोक त्यांच्या मुद्द्याला धरून बसून त्याच्या शक्यतांना समर्थन देत असत, काही पुरावे मांडत असत त्यावेळी तो प्रश्न विचारून त्या मुद्द्याच्या पाया, कारणं आणि पुरावे ह्यांना प्रोब करत असे.

१. हे असे का होते आहे?

२. तुला हे कसे माहीत आहे?

३. दाखवू शकतोस?

४. उदाहरण देऊ शकतोस?

अंदाजांना पडताळून पाहण्याचे प्रश्न:संपादन करा

बऱ्याचदा चर्चा करताना मुद्दे हे एकाच पद्धतीने (दृष्टिकोनातून) पाहून मांडले जातात. त्या दृष्टिकोनाला आव्हान देण्यासाठी तो हे प्रश्न विचारत असे.

१. ह्याकडे पाहण्याचा एखादा वेगळा दृष्टिकोन आहे का?

२. ह्याकडे अशा पद्धतीने पाहणे रास्त आहे का?

३. ह्याचा फायदा कोणाला होईल?

४. ह्यात...आणि त्यात... काय फरक आहे?

एकमत परिणाम पडताळासंपादन करा

जर मुद्द्यावर एकमत झालेच तर त्याचे परिणाम काय होऊ शकतील हे पडताळण्याचे प्रश्न: एखादा निर्णय घेतलाच तर त्याचे काय परिणाम होऊ शकतील हे अंदाजाने पडताळून पाहणे श्रेयस्कर ठरते. त्याचा लोकांनी काही विचार केला आहे का ते पाहण्यासाठी तो हे प्रश्न विचारत असे.

१. मग काय होऊ शकते?

२. आपण हे... त्यासाठी कसे वापरू शकतो?

३. हे आपण पूर्वी अनुभवल्याप्रमाणे वेगळे अथवा तसेच कसे होऊ शकते?

४. हे असे होणे का महत्त्वाचे आहे?

प्रश्नावर प्रश्न:संपादन करा

एखादा प्रश्न सॉक्रेटिसलाच विचारला तर तो त्याचे उत्तर दुसरा प्रश्न विचारून देत असे!

१. ह्या प्रश्नाचा रोख काय आहे?

२. आधीचा प्रश्न मी का विचारला होता असे तुला वाटते?