सेल्युकस निकेटर
सेल्युकस पहिला किंवा सेल्युकस निकेटर हा अलेक्झांडर द ग्रेट याच्या सैन्यातील पेर्डिक्कस या सेनापतीच्या तुकडीतील एक मॅसेडोनियाचा सरदार होता. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर उद्भवलेल्या युद्धात त्याने पेर्डिक्कसची कपटाने हत्या केली आणि तो भारताला लागून असलेल्या पर्शियन आणि मेसोपोटेमियाच्या प्रदेशाचा शासक बनला. तो सेल्युसिद साम्राज्याचा संस्थापक होता. चंद्रगुप्ताशी युद्ध हरल्यामुळे सेल्युकसने आपली कन्या हेलेना हिचा विवाह चंद्रगुप्ताशी ठरवला आणि तह घडवून आणला.