सेनादत्त पेठ (नवी पेठ) १९६२ साली पुण्यात झालेल्या महापुरामुळे जेव्हा सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनवार पेठ भागामधील घरांमध्ये पुराचे पाणी गेल्या मुळे अनेक लोक बेघर झाले. त्या वेळी वैकुंठ स्मशानाजवळच्या मोकळ्या जागेत भारतीय लष्कराने या लोकांची राहायची सोय केली. आणि त्या ठिकाणी भारतीय लष्कराने लोकांना लवकर तयार होणारी घरे बांधून दिली यांच घरांना निसानहट असे नाव आहे. आणि एक नवीन पेठ वसलेली गेली त्या मुळे या पेठेला नवी पेठ किवा सेनादत्त पेठ असे नाव पडले.