सूरपारंब्या
हा खेळ मुख्यत्वे वडाच्या झाडावर खेळायचा खेळ आहे. ह्यात एक पारंबी (फांदी) वरून दुसऱ्या पारंबीवर सुर मारायचा असतो म्हणजे उडी मारून पकडायची असते. सगळे खेळाडू मिळून एकच गट तयार करायचा असतो. त्याच गटातील एकावर राज्य असते. बाकी सर्वांनी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जमिनीला पाय न लावता उड्या मारायच्या असतात. ज्या खेळाडूचा पाय जमिनीला लागेल तो गडी बाद झाला अस समजायच. ज्याच्या खेळाडूवर राज्य असते त्याने झाडावरच्या मुलांना हात लावून बाद करायचे असते. जो गडी बाद होईल त्याच्यावर राज्य येते. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाताना मारलेली उडी म्हणजेच सूर, आणि त्यावरूनच ह्या खेळाचे नाव सूरपारंब्या पडले असावे. ह्या खेळामध्ये शारीरिक तकद फार महत्त्वाची असते, खास करून हाताच्या पकडीमध्ये असणारी ताकद. काही देशांमध्ये यासारख्या खेळाला क्रॉसफिट आणि फिक्शनल ट्रेनिंग असेही म्हणतात. तिथे हा खेळ लटकलेल्या दोरींच्या सहय्याने खेळतात.