सुहासिनी देशपांडे (अभिनेत्री)

सुहासिनी देशपांडे या एक मराठी तसेच हिंदी चित्रपट अभिनेत्री होत्या.[]

मानाचे कुंकू (१९८१), कथा (१९८३), आज झाले मुक्त मी (१९८६), आई शप्पथ..! (२००६), चिरंजीव (२०१६) आणि धोंडी (२०१७) या व इतर अनेक मराठी चित्रपटात त्यांनी भुमिका निभावल्या होत्या. २०११ सालच्या बाजीराव सिंघम या हिंदी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. याच सोबत कथा अकलेच्या कांद्याची, राजकारण गेलं चुलीत आणि सासुबाईंचं असंच असतं या व इतर नाटकामध्ये त्यांनी भूमिका बजावल्या. रंगभूमीवरील कार्याबद्दल त्यांना २०१५ साली अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या पुणे शाखेतर्फे जयंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.[]

मराठी-हिंदी चित्रपट

संपादन
  • आई शप्पथ!
  • आज झाले मुक्त मी
  • आम्ही दोघे राजा राणी
  • कथा
  • कुठं बोलू नका
  • गडबड घोटाळा
  • धग
  • मानाचं कुंकू
  • वक्त के पहले (हिंदी)
  • सिंघम (हिंदी)
  • हिरवा चुडा सुवासिनीचा
  • मंडळी तुमच्यासाठी काय पण

पुरस्कार

संपादन
  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे जयंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्कार (२०१५)
  1. ^ a b "ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं निधन". दैनिक लोकमत. २७ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.