सुरेश पाचकवडे हे एक मराठी कथालेखक व कवी आहेत. त्यांच्या कविता ३०हून अधिक वर्षांपासून 'अधिष्ठान', 'आशय', 'कवितारती', 'किस्त्रीम', 'दीपावली', 'महाराष्ट् टाइम्स', 'मिळून साऱ्याजणी', 'मौज', 'साहित्य', 'हंस' आदी कवितेच्या अभ्यासासाठी आवर्जून विकत घेतल्या जाणाऱ्या दर्जेदार दिवाळी अंकांतून प्रकाशित होत आल्या आहेत.

ते अकोल्याला राहतात.

कवितासंग्रह संपादन

  • कधीतरी
  • गोंदणवेणा (कथासंग्रह)
  • ग्रीष्मपर्व
  • सावली

सन्मान आणि पुरस्कार संपादन

  • दुसऱ्या एकलव्य साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
  • 'सावली' कवितासंग्रहाला सरकारी पुरस्कार मिळाला आहे.
  • गार्गी दिवाळी अंकातर्फे मुंबईच्या श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कथा स्पर्धेत सुरेश पाचकवडे यांच्या ‘मृत्युपथ’ कथेस गार्गी कथा पुरस्कार
  • ‘गोंदणवेणा’ या कथासंग्रहास महाराष्ट्र शासनाचा २००६चा पु.भा.भावे पुरस्कार