सुरक्षा जमा कक्ष तथा लॉकर हे आपले मौल्यवान ऐवज, दस्तऐवज ठेवण्यासाठी ग्राहकाने बँकेकडून भाड्याने घेतलेली डबावजा जागा असते. या सुरक्षा जमा कक्षा बद्दल बँक ग्राहकास वार्षिक भाडे आकारणी करते.

एकापेक्षा अधिक लोक एकाच सुरक्षा जमा कक्षा भाड्याने घेऊ शकतात. या सुरक्षा जमा कक्षाचे हाताळण्याचे अधिकार या पैकी कुठल्या धारकास आणि कसे द्यायचे ते सर्व कक्ष धारक ठरवू शकतात व त्या प्रमाणे बँकेला सूचना देऊ शकतात.

सुरक्षा जमा कक्ष हा बँक आणि ग्राहक यातील भाडे करार आहे. आपल्याला भाड्याने दिलेल्या कक्षात काय ठेवले आहे याची बँकेला कल्पना नसते. ग्राहकाने कुठल्याही बेकायदेशीर उद्योगासाठी अथवा इतर ग्राहकास त्रास होईल अशा वस्तू आपल्या कक्षात ठेवू नये हे बंधनकारक असते.

सुरक्षा जमा कक्षास नामनिर्देशनाची सोय उपलब्ध आहे.

सुरक्षा जमा कक्षाची सुरक्षितता संपादन

  • सुरक्षा जमा कक्ष असणारी खोली ही चहुबाजूने आर सी सी बांधकामाने मजबूत केलेली असते.
  • प्रत्येक कक्षाला दोन कुलुपे असतात. एका कुलुपाची किल्ली ग्राहकाकडे आणि दुसऱ्या कुलुपाची किल्ली बँकेच्या जबाबदार अधिकाऱ्याकडे असते.
  • दोन्ही किल्ल्या एकावेळी लावल्याशिवाय कक्ष उघडता येत नाही.
  • कक्ष बंद करताना ग्रहाकडे असणाऱ्या एका किल्लीनेच बंद करता येतो.
  • सुरक्षा जमा कक्षात असणाऱ्या कुठल्याही वस्तूंचा विमा बँकेने उतरवलेला नसतो.

किल्ली हरवल्यास संपादन

१) ग्राहकाला बँकेकडे आपल्या सुरक्षा जमा कक्षाची किल्ली हरवल्याचा अर्ज सर्व कक्षधारकांच्या सहीने द्यावा लागतो

२) बँक कक्ष बनवणाऱ्या कंपनीला या विशिष्ट कक्षाचे दार उघडून देण्याची विनंती करते.

३) ठराविक दिवशी सर्व कक्षधारक, बँक अधिकारी आणि कंपनीचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत कुलूप तोडून कक्ष उघडला जातो. कक्ष धारक आपल्या चीजवस्तू ताब्यात घेतात.

४) काही काळाने कंपनी नावे कुलूप, किल्ली सह कक्षाचा दरवाजा बसवून दिला जातो.

५) या सर्व खटाटोपाबद्दल बँक आपल्या ग्राहकास सेवा शुल्क आकारते.