सुब्रमण्यन रामस्वामी
सुब्रमण्यन रामस्वामी किंवा रामसामी (५ जून १९३९ - १५ मे २०१७) हे एक भारतीय राजकारणी होते जे पाँडिचेरी या केंद्रशासित प्रदेशाचे ४ थे मुख्यमंत्री होते. त्यांनी ६ मार्च १९७४ ते २८ मार्च १९७४ पर्यंत तिसऱ्या विधानसभेत आणि २ जुलै १९७७ ते १२ नोव्हेंबर १९७८ पर्यंत चौथ्या विधानसभेत काम केले.[१] [२]
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | சுப்பிரமணியன் ராமசாமி | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | इ.स. १९३७ Villianur | ||
मृत्यू तारीख | मे १५, इ.स. २०१७ | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
रामस्वामी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला द्रविड मुन्नेत्र कळघममधून सुरुवात केली आणि १९६९ ते १९७३ द्रमुक - भारतीय कम्युनिस्ट पक्ष या युती मंत्रालयात ते पाँडिचेरीचे गृहमंत्री बनले. १९७३ मध्ये अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाकडे ते वळले जो एम.जी. रामचंद्रन यांनी १९७२ मध्ये द्रमुकचा एक विभक्त गट म्हणून स्थापना केला होता.
१९७४ मध्ये पाँडिचेरी विधानसभेच्या निवडणुकीत, अण्णा द्रमुक - कम्युनिस्ट पक्षाची युती सत्तेवर आली आणि रामस्वामी यांना थोड्या काळासाठी मुख्यमंत्री बनवण्यात आले. १९७७ मध्ये त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. १९८५ मध्ये त्यांनी कराईकलमधून अपक्ष म्हणून यशस्वीपणे निवडणूक लढवली. पुढे रामस्वामी १९९२ मध्ये काँग्रेसमध्ये दाखल झाले.[३]
संदर्भ
संपादन- ^ "States of India since 1947 - Pondicherry (Puducherry)".
- ^ "Former Puducherry Chief Minister Ramassamy passes away". द टाइम्स ऑफ इंडिया. PTI. 15 May 2017. 22 September 2019 रोजी पाहिले.
- ^ "Puducherry: Former CM Subrahmanyan Ramaswamy passes away". The DNA India. 15 May 2017. 28 November 2020 रोजी पाहिले.