सूफी मत

(सुफी मत या पानावरून पुनर्निर्देशित)

सूफी मत किंवा तसव्वुफ (अरबी : تصوّف‎) याची व्याख्या सूफी पंथाच्या स्वीकारकर्त्यांकडून इस्लामची आंतरिक, गूढवादी मिती अशी केली गेलेली आहे.[१][२][३] हे मत मान्य असणारांनाही 'सूफी' (रोमन : ṣūfī, उर्दू : صُوفِيّ) म्हणतात आणि ते मुस्लिमांपुरतेच मर्यादित नाहीत. गॅब्रिएल या देवदूताने प्रेषित मुहम्मदाजवळ उघड केलेली उपासनेची पद्धत (एहसान) आपण आचरीत आहोत असा सूफींचा विश्वास आहे.

अभिजात सूफी विद्वानांनी सूफी मताची व्याख्या "ज्या शास्त्राचे उद्दिष्ट हृदयाची दुरुस्ती आणि ईश्वर वगळता इतर सर्व गोष्टींकडे त्याला पाठ फिरविण्यास लावणे असे शास्त्र" अशी केली आहे. अहमद इब्न अबिजा या सूफी गुरूच्या म्हणण्यानुसार सूफी मत म्हणजे "दिव्यत्वाकडे प्रवास कसा करावा, आपले अंतरंग वाईट गोष्टी सोडून शुद्ध कसे करावे आणि प्रशंसनीय गुणांनी त्याला कसे सजवावे हे सांगणारे शास्त्र होय." विख्यात भारतीय गूढवादी ओशो यांच्या म्हणण्यानुसार सूफी मत हे नाव बाहेरच्या व्यक्तींनी दिलेले असून कोणताही सूफी त्याला 'मत' समजत नाही. "परमेश्वराशी असलेले, अंतिम सत्तेशी असलेले, समग्रतेशी असलेले प्रेमप्रकरण म्हणजे 'सूफी'" अशी व्याख्या त्यांनी केली आहे.[४]

पहा संपादन

  • गूढवाद
  • सुफी कवी जायसी (पुस्तक, लेखक - प्रा. डॉ. विश्वास पाटील) . (
  • सुफी संत (पुस्तक, मूळ लेखक साधू टी.एल. वासवानी, संपादन जे.पी. वासवानी; मराठी पुनर्लेखन श्याम वि, फडके)
  • सूफींची आदमगिरी : सूफी परंपरा व तत्त्वज्ञान (पुस्तक, लेखक - प्रा. अलीम वकील)
  • सूफी तत्त्वज्ञान : स्वरूप आणि चिंतन (पुस्तक, लेखक डॉ. मुहम्मद आजम)
  • सूफी संप्रदाय (पुस्तक, एजाज शेख)
  • सूफी संप्रदायाचे अंतरंग (पुस्तक, लेखक - प्रा. अलीम वकील)


संदर्भ व नोंदी संपादन

  1. ^ Alan Godlas, University of Georgia, Sufism's Many Paths, 2000, University of Georgia
  2. ^ Nuh Ha Mim Keller, "How would you respond to the claim that Sufism is Bid'a?", 1995. Fatwa accessible at: Masud.co.uk
  3. ^ Zubair Fattani, "The meaning of Tasawwuf", Islamic Academy. Islamicacademy.org
  4. ^ Osho, Sufis The People of The Path, Vol. 01, pp. 2