प्रा. सुनील अभिमान अवचार यांचा जन्म २६ जानेवारी १९७८ रोजी झाला. त्यांचे शिक्षण एम. ए. नेट, सेट, पीएच. डी. पर्यंत मराठी विषयात झाले आहे. ते व्यवसायाने प्राध्यापक असून सध्या मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात साहाय्यक प्राध्यापक आहेत. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्रांत विविध विषयांवरील शोधनिबंधांचे वाचन केले आहे, तसेच सहभाग नोंदविला आहे.[ संदर्भ हवा ] ते एक चित्रकारही आहेत. चित्रविक्रीमधून आलेल्या पैशांतून ते मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करतात.

चित्र:अवचार.jpg
अवचार

प्रकाशित साहित्य व संपादने

संपादन
  • अवचार यांचा [केंद्र हरवत चाललेल्या वर्तुळाचा परीघ] हा बहुचर्चित काव्यसंग्रह २०१६ साली कोल्हापूरच्या 'निर्मिती संवाद' ने प्रकाशित केला आहे.
  • [जागतिकीकरण आणि मराठी कविता] ह्या महत्त्वपूर्ण ग्रंथाचे संपादन डॉ. अवचार यांनी केले असून हा ग्रंथ २०१२ साली मुंबईच्या देवयानी प्रकाशनने प्रकाशित केला आहे.
  • मी महासत्तेच्या दारात कटोरा घेऊन उभा राहणार नाही (मूळ इंग्रजी कवितासंग्रह : वर्ड इज नॉट फॉर सेल)

काव्यवाचन

संपादन

१. Knots : art spech वडोदरा(गुजरात), poetry from underground - २७ एप्रिल, २०१५

२. ५ वे सम्यक साहित्य संमेलन, पुणे- १७ ते २० डिसेंबर, २०१५

३. ४ थे सम्यक साहित्य संमेलन, पुणे- १३ ते १५ डिसेंबर, २०१३

४. 'कृत्या' आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सव, नागपूर- १९ ते २१ जानेवारी, २०११

५. ८१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सांगली - १८ ते २१ जानेवारी, २००८

६. आदिवासी साहित्य संसद आयोजित सातवे अखिल भारतील आदिवासी साहित्य संमेलन, अमरावती- २३ व २४ डिसेंबर, २००६

चित्र प्रदर्शन

संपादन

१. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त 'डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ सोशल अँड इकॉनॉमिक चेंज आणि फोटोग्राफी प्रमोशन ट्रस्ट कलर्स ऑफ डीसेंट आर्टिस्ट सेंटर मुंबई' येथे. ११ ते १७ एप्रिल, २०१६.

२. मुंबईतील टाटा सामाजिक विज्ञान संस्था-आयोजित The Other Peoples ७ एप्रिल, २०१५

३. Knots : art spech वडोदरा(गुजरात)- २५ एप्रिल, २०१५

४. मानवमुक्तीसाठी एल्गार सांस्कृतिक चळवळ आयोजित पहिले सांस्कृतिक संमेलन 'Art for Social Justice' शनिवार वाडा पुणे, ३० व ३१ मे, २०१५

संदर्भ

संपादन