सुतार पक्षी हा एक झाडांमध्ये चोचीने मोठे भोक पाडून घरटे बनवणारा पक्षी आहे. सुतार जसे लाकडाचे काम करतो तसा हा पक्षी झाडात घरटे कोरतो. म्हणून या पक्ष्याला सुतार पक्षी असे नाव पडले.

सुतार पक्षी मुख्यतः झाडाच्या खोडांवर आणि फांद्यांवर कीटकांच भक्षण करतात आणि बहुतेक वेळा त्यांच्या चोचीने विशिष्ट प्रकारचा आवाज काढून एकमेकांशी संवाद साधतात. सुतार पक्षी हा ऑस्ट्रेलिया, न्यू गिनी, न्युझीलंड, मादागास्कर आणि अंटार्क्टिका सोडून जगभर सर्वत्र आढळून येणारा पक्षी आहे.

शारीरिक बदल

संपादन

सुतार पक्षांनी परिस्थितीला जुळवून घेत बरेच बदल घडवलेले आहेत. त्यामुळेच ते स्वतःला इजा न करता लाकडावर जोरदारपणे मारा करू शकतात. त्यांची कवटी जाड आहे आणि मेंदूत शोषक ऊतकांद्वारे (absorptive tissue) उशी केली जाते, ज्यामुळे ते त्यांच्या डोक्याच्या वारांच्या शारीरिक धक्क्यांना सहन करण्यास मदत करतात. सुतार पक्षाची जीभ लांबलचक, काटेरी आणि चिकट असते ज्यातून किडे पकडता येतात. सुतार पक्ष्याची चोच टोकदार असते सततच्या मारामुळे ती वाढत राहते. झाडाच्या पृष्ठभागावर धरण्यास अनुकूल असावेत म्हणून सुतार पक्षांच्या पायाचे दोन बोटे पुढे आणि दोन मागे असतात. []

बहुतेक सुतार पक्षी हे स्थिरावलेले आहेत व फार कमी प्रजाती स्थलांतरित आहेत. बहुतेक सुतार पक्षांच्या हालचालींचे वर्णन विखुरलेले आहे असे म्हणता येईल. तरुण पक्षी कडक हवामानापासून बचाव करण्यासाठी पळ काढून स्थलांतर करतात. काही प्रजाती स्थलांतरित असतात, उदाहरणार्थ, करड्या-रंगाच्या सुतार पक्षी हिवाळ्यातील महिन्यांत डोंगरावरून सखल भागात जातात.

वर्तन

संपादन

बहुतेक सुतार पक्षी एकटे आयुष्य जगतात, परंतु त्यांचे वर्गीकरण हे असामाजिक प्रजातीपासून ते समूहात राहणाऱ्या प्रजातींमध्ये करता येऊ शकते.

संदर्भ

संपादन