सुखुमी किंवा सोखुमी हे जॉर्जिया देशाच्या अबखाझिया या फुटीर प्रांताची राजधानी आहे.

या शहराचा उल्लेख इ.स.पू. ६व्या शतकातील ग्रीक इतिहासात सापडतो. त्यावेळ याचे नाव डियोस्कुरियास होते. १९९२-९३मध्ये झालेल्या जॉर्जिया अबखाझिया युद्धादरम्यान या शहराचे मोठे नुकसान झाले. १९९०च्या दशकाअखेर सव्वा लाख्याच्या वर वस्ती असलेल्या या शहरात २०११च्या जनगणनेनुसार ६२,९१४ व्यक्ति राहत होत्या.