सीता साहू
भारतीय खेळाडू
सीता साहू ही विशेष ऑलिंपिक स्पर्धेमध्ये विजय मिळवणारी भारतातील दुसरी खेळाडू आहे. ती मूळची मध्य प्रदेशातील असून तिने अथेन्समध्ये २०११ साली झालेल्या स्पेशल ऑलिंपिक स्पर्धांत २०० मीटर आणि ४x४०० मीटर रिले शर्यत या दोन्ही शर्यतीत कास्य पदके जिंकली. ही पदके जिंकली तेव्हा ती जेमतेम १५ वर्षांची होती.
ती आणि तिचे कुटुंब रस्त्यावर एक खाण्याचे दुकान चालवतात.