सिरसगाव मंडप

स्थान संपादन

सिरसगाव मंडप हे गाव महाराष्ट्र राज्यातल्या जालना जिल्ह्यातील भोकरदन या तालुक्यात आहे. हे गाव भोकरदन - हसनाबाद रस्त्यावर सिरसगाव पाटी पासून 2 km अंतरावर वसलेले आहे. औरंगाबाद व "जालना येथे जवळचे रेल्वे स्थानक आहे.

लोकजीवन संपादन

गावात प्रामुख्याने हिंदू,बौद्ध, मुस्लिम धर्मीय आहेत. गावातील 80 टक्के लोकसंख्या ही मराठा कुणबी जातीची आहे.बहुतांश लोकसंख्या सहाने हे आडनाव असलेली आहे.

प्रशासन संपादन

इथला कारभार हा ग्रामपंचायतीमार्फत चालतो.गावचे सरपंच सुरज पाटील सहाणे हे आहेत. हे गाव भोकरदन पोलीस स्टेशनाच्या हद्दीत येते. तहसील कार्यालय भोकरदन येथे आहे.

शिक्षण संपादन

गावात जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा व शिवशंकर माध्यमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते.

आरोग्य संपादन

गावात महाराष्ट्र शासनाचे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे,हसनाबाद आरोग्य केंद्र अंतर्गत. तसेच खाजगी इस्पितळही आहे.

व्यवसाय संपादन

येथील जनजीवन हे शेती व्यवसायावर अवलंबून आहे. काही लोक इतर व्यवसाय करतात. येथे जालना जिल्हा मध्यवर्ती बँक व महाराष्ट्र गोदावरी ग्रामीण बँक या बँका भोकरदन येथे आहेत.