सिद्धेश्वर मंदिर
सिद्धेश्वर मंदिर' भारतातील महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यात महिकावती माहीम गावी आहे. पालघर रेल्वे स्थानकावरून माहीम- वडराईला जाणाऱ्या बसेस पकडून राममंदिर बसथांब्यावर उतरून सरळ चालत गेले की जेथे पक्की सडक संपते तेथे हे मंदिर, बसथांब्यापासून साधारण ३०० मीटर अंतरावर आहे. मंदिराच्या समोरच एक मोठे तळे आहे. तळ्यामध्ये मासे, बदके, तसेच विविध प्रकारचे पक्षी भक्ष्य शोधण्यासाठी नेहमी घिरट्या घालत असतात. किंगफिशर हा पक्षी येथे नेहमी दृष्टिपथास पडतो. मंदिराचा जीर्णोद्धार हल्लीच केलेला आहे. मंदिराच्या आवारात अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतींची तसेच बहूपयोगी वृक्षांची लागवड केलेली आहे. येथे व्यायाम करण्यासाठी साधने उपलब्ध आहेत, तसेच चालण्यासाठी चौकोनाकार पदपथ बनविलेला आहे.[१]
संदर्भ
संपादनसिद्धेश्वर मंदिर स्मरणिका.
- ^ श्री सिध्देश्वर मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा महोत्सव स्मरणिका सोमवार २६/०१/२०१५ :जीर्णोद्धार समिती, माहीम, पालघर ४०१४०२.