सिद्धेश्वर स्वामी

एक संत
(सिद्धेश्वर या पानावरून पुनर्निर्देशित)

सिद्धेश्वर स्वामी हे लिंगायत संप्रदायातील एक संत होते.

सिद्धेश्वर स्वामी

निर्वाण फाल्गुन कृ.२ , शके १५७१,
महाराष्ट्र
भाषा मराठी
साहित्यरचना पाच हजारांवर वचने
कार्य समाजसुधारक, कवी, विचारवंत, लोकशिक्षक
व्यवसाय वाणी

बालपण

संपादन

सद्गुरूंचा शोध

संपादन

अभ्यास

संपादन

कार्य

संपादन

सिद्धेश्वर स्वामी यांनी स्थापन केलेली ६८ लिंगे

संपादन
लिंग क्रं. लिंगाची नावे लिंगाची स्थाने लिंगाची चित्र
श्री अमृत लिंग श्री सिद्धेश्वर देवालयाच्या आवारात
 
श्री अमृत लिंग
श्री पापेश्वर लिंग श्री सिद्धेश्वर देवालयाच्या आवारात
 
श्री पापेश्वर लिंग
श्री पोपेश्वर लिंग श्री सिद्धेश्वर देवालयाच्या आवारात
 
श्री पोपेश्वर लिंग
श्री संगमेश्वर लिंग श्री सिद्धेश्वर देवालयाच्या आवारात
 
श्री संगमेश्वर लिंग
श्री परमेश्वर लिंग श्री सिद्धेश्वर देवालयाच्या आवारात फोटो
 
श्री परमेश्वर लिंग
श्री योगीनाथ लिंग श्री सिद्धेश्वर देवालयाच्या आवारात
 
श्री योगीनाथ लिंग
श्री वज्रेश्वर लिंग श्री सिद्धेश्वर देवालयाच्या आवारात
 
श्री वज्रेश्वर लिंग
श्री ओंकारेश्वर लिंग श्री सिद्धेश्वर देवालयाच्या आवारात
 
श्री ओंकारेश्वर लिंग
श्री आहेश्वर लिंग श्री सिद्धेश्वर देवालयाच्या आवारात
 
श्री आहेश्वर लिंग
१० श्री माहेश्वर लिंग श्री सिद्धेश्वर देवालयाच्या आवारात
 
श्री माहेश्वर लिंग
११ श्री अकलेश्वर लिंग श्री सिद्धेश्वर देवालयाच्या आवारात
 
श्री अकलेश्वर लिंग
१२ श्री उमेश्वर लिंग संमती कट्टा ( श्री सिद्धेश्वर देवालयाच्या आवारात)
 
श्री उमेश्वर लिंग
१३ श्री शिखरेश्वर लिंग श्री सिद्धेश्वर देवालय महाद्वार
 
श्री शिखरेश्वर लिंग
१४ श्री आदि लिंगेश्वर लिंग श्री सिद्धेश्वर देवालय महाद्वार
 
श्री आदि लिंगेश्वर लिंग
१५ श्री नंदिकेश्वर लिंग श्री सिद्धेश्वर देवालय महाद्वार
 
श्री नंदिकेश्वर लिंग
१६ श्री आलेश्वर लिंग श्री सिद्धेश्वर देवालय महाद्वार
 
श्री आलेश्वर लिंग
१७ श्री तेलेश्वर लिंग नॉर्थकोट हायस्कूलजवळ
 
श्री तेलेश्वर लिंग
१८ श्री विश्वेश्वर लिंग डफरीन हॉस्पिटलजवळ
 
श्री विश्वेश्वर लिंग
१९ श्री ब्रह्मेश्वर लिंग महापौर बंगल्यासमोर, रेल्वे लाईन
 
श्री ब्रह्मेश्वर लिंग
२० श्री कोपेश्वर लिंग हेड पोस्ट ऑफिसजवळ
 
श्री कोपेश्वर लिंग
२१ श्री अडकेश्वर लिंग शनी मंदिर आवार,रेल्वे स्टेशनजवळ [[File:21 Adakeshwar ling.jpg|thumb|श्री अडकेश्वर
२२ श्री त्रिपुरेश्वर लिंग शनी मंदिर आवार,रेल्वे स्टेशनजवळ
 
श्री त्रिपुरेश्वर लिंग
२३ श्री आनंदेश्वर लिंग उमा नगरी, (जुनी मिल आवार)
 
श्री आनंदेश्वर लिंग
२४ श्री हावगेश्वर लिंग मुरारजी पेठ (दुध पंढरी जवळ)
 
श्री हावगेश्वर लिंग
२५ श्री रामेश्वर लिंग मुरारजी पेठ (दुध पंढरी जवळ)
 
श्री रामेश्वर लिंग
२६ श्री नागेश्वर लिंग मुरारजी पेठ (दुध पंढरी जवळ)
 
श्री नागेश्वर लिंग
२७ श्री रामभद्रेश्वर लिंग मुरारजी पेठ (दुध पंढरी जवळ)
 
श्री रामभद्रेश्वर लिंग
२८ श्री होमेश्वर लिंग धरमसी, एस.टी.बसस्थानकसमोर
 
श्री होमेश्वर लिंग
२९ श्री जगेश्वर लिंग चक्रदेव मळा (जुना पुणे नाक्याजवळ)
 
श्री जगेश्वर लिंग
३० श्री अनंतनामेश्वर लिंग भोगडे वस्ती कॅनाल
 
श्री अनंतनामेश्वर लिंग
३१ श्री पाशुपतीय लिंग देशमुख मळा, गणेश नगर
 
श्री पाशुपतीय लिंग
३२ श्री शतकेश्वर लिंग चंडक बगीचा, कस्तुरबा मार्केटजवळ
 
श्री शतकेश्वर लिंग
३३ श्री यल्लेश्वर लिंग यल्लेश्वर कॉम्प्लेक्स , बुधवार पेठ
 
श्री यल्लेश्वर लिंग
३४ श्री जंबुकेश्वर लिंग बाळीवेस मारूती मंदिर (तळघरात)
 
श्री जंबुकेश्वर लिंग
३५ श्री जबरेश्वर लिंग बाळीवेस मारूती मंदिर
 
श्री जबरेश्वर लिंग
३६ श्री जगदेश्वर लिंग बाळीवेस मारूती मंदिर
 
श्री जगदेश्वर लिंग
३७ श्री बंडेश्वर लिंग शेटे वाडा,पश्चिम मंगळवार पेठ
 
श्री बंडेश्वर लिंग
३८ श्री भद्रेश्वर लिंग शेटे वाडा,पश्चिम मंगळवार पेठ
 
श्री भद्रेश्वर लिंग
३९ श्री शेळगी गणेश लिंग शिवानुभव मंगल कार्यालय, पूर्व मंगळवार , पेठ
 
श्री शेळगी गणेश लिंग
४० श्री कामेश्वर लिंग शिवानुभव मंगल कार्यालय, पूर्व मंगळवार , पेठ
 
श्री कामेश्वर लिंग
४१ श्री शंकेश्वर लिंग शिवानुभव मंगल कार्यालय, पूर्व मंगळवार , पेठ
 
श्री शंकेश्वर लिंग
४२ श्री पंचमुखी लिंग शिवानुभव मंगल कार्यालय, पूर्व मंगळवार , पेठ
 
श्री पंचमुखी लिंग
४३ श्री अमोधेश्वर लिंग साखरे वाडा , मन्मथेश्वर मंदिर शेजारी
४४ श्री सोमेश्वर लिंग मधला मारुती मंदिर
 
श्री सोमेश्वर लिंग
४५ श्री अहीमुखीब्रह्मेश्वर लिंग खारी बावडी, शुक्रवार पेठ
 
श्री अहीमुखीब्रह्मेश्वर लिंग
४६ श्री ब्रह्मानादेश्वर लिंग शुक्रवार पेठ, मारुती मंदिर
 
श्री ब्रह्मानादेश्वर लिंग
४७ श्री अचलेश्वर लिंग कालिका मंदिर, शुक्रवार पेठ
 
श्री अचलेश्वर लिंग
 
श्री अचलेश्वर लिंग
४८ श्री चिन्हेश्वर लिंग त्रिपुरांतकेश्वर मंदिर,शुक्रवार पेठ
 
श्री चिन्हेश्वर लिंग
४९ श्री त्रिपुरांतकेश्वर लिंग त्रिपुरांतकेश्वर मंदिर,शुक्रवार पेठ
 
श्री त्रिपुरांतकेश्वर लिंग
५० श्री सर्वेश्वर लिंग पंचकट्टा ,सिद्धेश्वर शॉपिंग सेंटरजवळ
 
श्री सर्वेश्वर लिंग
५१ श्री उमामहेश्वर लिंग गुरूभेट समोर, जिल्हा परिषद जवळ
 
श्री उमामहेश्वर लिंग
५२ श्री नवणेश्वर लिंग गुरूभेट, जिल्हा परिषद जवळ
 
श्री नवणेश्वर लिंग
५३ श्री सिद्धवंती लिंग होमकट्टा (होम मैदान )
 
श्री सिद्धवंती लिंग
५४ श्री ज्योतीश्वर लिंग होमकट्टा (होम मैदान )
 
श्री ज्योतीश्वर लिंग
५५ श्री अकलेश्वर लिंग पार्क मैदान (इंदिरा गांधी स्टेडीयम)
 
55 akleshwar ling
५६ श्री गोमुख लिंग पार्क मैदान (इंदिरा गांधी स्टेडीयम)
 
56 gomukh ling
५७ श्री बालब्रह्मेश्वर लिंग पार्क मैदान ( जिमखाना जवळ )
 
57 balbrameshwar ling
५८ श्री वज्रेश्वर लिंग पार्क मैदान ( जिमखाना जवळ )
 
58 vajreshwar ling
५९ श्री उमामहेश्वर लिंग पार्क मैदान ( जिमखाना जवळ )
 
59 umamaheshwar ling
६० श्री बालयोगीश्वर लिंग पार्क मैदान ( जिमखाना जवळ )
 
60 balyogishwar ling
६१ श्री शमीश्वर लिंग पार्क मैदान ( जिमखाना जवळ )
 
61 shamishwar ling
६२ श्री खयेश्वर लिंग किल्ला बागेसमोर, सुभाष चौक
 
62 khayeshwar ling
६३ श्री मोळगेश्वर लिंग श्री. काळम्मा मंदिर, उ.कसबा पेठ
 
63 molgeshwar ling
६४ श्री कुठारसोमेश लिंग श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर, किरीटेश्वर मठ
चित्र:श्री. कुठार सोमेशलिंग (६४ ) – श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर सोलापूर.jpg
श्री. कुठार सोमेशलिंग (६४ ) – श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर सोलापूर
,
 
श्री कुठारसोमेश लिंग
६५ श्री मल्लिकार्जुन लिंग श्री. मल्लिकार्जुन मंदिर
 
श्री मल्लिकार्जुन लिंग
६६ श्री आयलेश्वर लिंग श्री. मल्लिकार्जुन मंदिर आवार
 
श्री आयलेश्वर लिंग
६७ श्री आनंदेश्वर लिंग श्री. मल्लिकार्जुन मंदिर आवार
 
श्री आनंदेश्वर लिंग
६८ श्री उमाक्षेत्रेश्वर लिंग श्री. मल्लिकार्जुन मंदिर आवार
 
श्री उमाक्षेत्रेश्वर लिंग

गड्डा यात्रा

संपादन

सोलापूरचे मुळ नाव सोन्नलिगे हे आहे. सिद्धरामेश्वर हे १२ व्या शतकातील महान संत व समाजसुधारक होते. त्यांनी सर्वप्रथम सामूहिक विवाहाची सुरुवात केली. तलाव निर्मीतीचे ते खंदे पुरस्कर्ते होते. त्यांनी सोलापूरात ६८ लिंगांची स्थापना केली. कपीलसिद्ध मल्लिकार्जुन हे त्यांचे आराध्य दैवत होते. सिद्धरामेश्वर हे महात्मा बसवेश्वरांनी कल्याण (कर्नाटक) येथे स्थापन केलेल्या अनुभव मंटपाचे तृतीय अध्यक्ष होते. कर्माला महत्त्व् देणाऱ्या सिद्धरामेश्वरांनी आपल्या समग्र आयुष्यात लोकोपयोगी कार्य केले. त्यांनी आयुष्यभर लग्न केले नाही. अंतिमतः त्यांनी संजीवन समाधी सोलापूर या ठिकाणीच घेतली. लोकांनी त्यांचे दैवतीकरण करून मंदिर उभे केले आहे. सोलापूरकरांचे कुलदैवत म्हणुन सिद्धरामेश्वर प्रसिद्ध आहेत. सोलापूर येथे सिद्धरामेश्वर यांची जीवंत समाधी आहे. मकरसंक्रांतीच्या जत्रा असते. या यात्रेत काठीविवाह सोहळा संपन्न होतो. पाच दिवस सिद्धरामेश्वरांच्या नावाने घरोघरी सोलापूरात दिवा बसवला जातो. गड्यापीच्या यात्रेचे एक वैशिष्य्म म्हणजे या यात्रेत पुरूष अंगात बाराबंदी, धोतर, डोक्यावर पांढरा फेटा बांधतात. ही जत्रा चार दिवस चालते. यात्रेचे स्वरूप : १) पहिल्या दिवशी तेलाचा अभिषेक (तैलाभिषेक) २) दुसऱ्या दिवशी अक्षता ३) तिसऱ्या दिवशी होम ४) चौथ्या दिवशी दारूची (फटाक्यांची)अतिशबाजी प्रसाद – अक्षते दिवशी बाजरीची भाकरी, भाजी, शेंगदाणे व गुळाची पोळी []

चित्रपट

संपादन

जय सिद्धश्वर

स्मारके

संपादन

भारत हा एकच देश जगाच्या पाठीवर सदाचार- संस्कृतीप्रधान देश आहे. येथील संस्कार अन्य कोठेही मिळणारे नाहींत. याच आधारे असे सांगता येईल की, १२ व्या शतकात फार मोठे शिवशरण होऊन गेले. जीव शिवशरण झाला नाही, तर त्याला पूर्णत्व प्राप्त होणार नाही. मानवी जीवन शिवशरण झाले तरच चिरकृतार्थ होऊ शकते याचे गमक याच काळी उदयाला आले. शिवशरणाच्या प्रभावाने अनेक जीव या काळी शिवशरण झाले. याच समयी कर्नाटकातच नव्हे, तर उभ्या भारताने ज्यांना शिरी घेऊन वंदावे; स्तवावे व पूजावे असे बसवेश्वर होऊन गेले. त्यांनी केवळ आध्यात्मिकच क्रांती केली असे नव्हे, तर आत्मिक परिवर्तनासाठी आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक व राजकीय क्रांतीही केली.
नामे अनेक असली तरी देव मात्र एक हे अनादि तत्त्व सर्वांना स्वजीवनात आचरण करून पटवून दिले. 'विशेष आचरावे लागे संती |' सर्वच क्षेत्रात त्यांनी समानत्व आणले. स्पृश्यास्पृश्य भेदांना मूठमाती दिली. स्त्रियांनासुद्धा अध्यात्माचा अधिकार आहे असे गर्जून सांगितले.
याच वेळी सोलापूर येथे श्री सिद्धरामेश्वर महाराज उदयास आले. त्यांनी सार्वजनिक कल्याणाप्रीत्यर्थ देवालये, धर्मशाळा, तलावादी बांधकामे केली. त्यांच्या या लोकोपयोगी कार्याचा खूप बोलबाला झाला. त्या वेळी श्रेष्ठ साधू श्री अल्लम प्रभू हे सोलापुरी आले. त्यांची व श्री सिद्धरामेश्वरांची भेट झाली. अध्यात्मावर थोडा वाद- विवादही झाला.
त्या वेळी श्री अल्लमप्रभूंनी सिद्धेश्वरांना सांगितले, केवळ कर्मयोगाचरणाने माणूस परिपूर्ण होत नाही, अंतःकरण्याच्या शुद्धीला बहिरंग शुद्धीचीही आवश्यकता आहे. अशासंबंधी मोठी क्रांती सध्या बसवकल्याण येथे चालू आहे. या क्रांतीचे विचारी व आचारी अध्वर्यूपद श्री बसवेश्वर यांना लाभले आहे. तेंव्हा आपण त्यांना भेटावे. अल्लमप्रभूंसह श्रीसिद्धेश्वर बसवकल्याणला आले.
बसवेश्वरांची भेट झाली. आत्म व परकल्याणकारी अध्यात्माची आत्मिक चर्चा झाली. परमार्थाचे इंगित आणि महत्त्व श्री सिद्धेश्वरांना उमजले. ही सर्व मंडळी प्रत्यही अनुभव मंडपाच्या चर्चेत भाग घेत. परमार्थ हा परिश्रमवादी असावा. उदरभरणासाठी कोणावर अवलंबून असता कामा नये, या न्यायाने परिश्रम करून धन मिळवणे ही अट सर्वांनाच होती. या मंडपांत जातपातधर्म हा भेदभाव बाळगला जात नसे. त्यानंतर काही काळ या मंडपाचे अध्यक्षपदही श्री सिद्धरामेश्वरांना प्राप्त झाले होते.

सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर मंदिराला श्रावण महिन्यात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात येते. तर मंदिरातील योग समाधीला श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी ७०० ते ८०० किलो फुलांनी सजवण्यात येते.

सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाच्या पूजेने यात्रेची सुरुवात होते. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक येथील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या या यात्रेला तब्बल ९०० वर्षांची (कुठपासून?) परंपरा आहे.

लिंगायत धर्म सहिंता - वचन साहित्य

संपादन

प्रत्येक धर्माला आधारभूत असे साहित्य असावयास हवे. त्या तत्त्वाच्या अनुयायींच्या मध्ये फूट पडून अस्तव्यस्त न होता संघटीत होऊन राहण्यास सर्वाना एकासूत्तात बांधणारे साहित्य असावे. ख्रिश्चन लोकांना बायबल, इस्लामीयांना कुरान असल्याप्रमाणे लिंगायत धर्मास बचन साहित्य हेच आधार साहित्य होय. बसवेश्वरांनी लिहिलेल्या षटस्यल बचनांत लिंगायत धर्माचे संपूर्ण सार सर्वस्व आहे.
बसवेश्वर आणि त्यांचे सहकारी शरणांची बचने आपल्याला अचार-विचाराबदृल मार्गदर्शन करणारे साहित्य म्हणून प्रत्येक लिंगायताने मानले पाहिजे. नंतर आलेले तोंटद सिद्धलिंगेश्वर षण्मुख स्वामी म्ग्गेय मायीदेव इत्यादींचे बचने बसवादि शरणाच्या वचनावर तात्त्विक सुत्रवार भाष्य, टीका लिहल्याप्रमाणे आहेत. त्यानंतर निजगुण शिवयोगी, मुप्पिन षडक्षरी, सर्पभूषण शिव्योगी बाल्लीला महंत योगी इ. प्रत्येक शिवयोगींचे साहित्य लिंगायत परंपरेत आहे. याशिवाय बसवादि प्रमथापासुन त्यानंतर होऊन गेलेल्या प्रत्येक शरणांच्या जीवनावर रचलेली पुराणे व काव्य साहित्य आहेत. या सर्व साहित्याचा अभ्यास केल्यावर असे वाटू लागते की बसवादि शिवशरणांचे बचन साहित्य हे लिंगायत धर्माच्या पाठ्य पुस्तकाप्रमाणे आहे. श्री. सिद्धलिंगेश्वर षणमुख स्वामी,मग्गेय मायीदेव इ वचन साहित्याला प्रथम क्रमांकात प्रमाण ग्रंथ असे म्हणता येईल निजगुण श्विवयोगी, मुप्पीनार्थ, शिवायोगि शिवाचार्य इत्यादिंचे साहित्य व्दीतीय क्रमांकाचे प्रमाण ग्रंथ, हरीहर, राघवंक, चामरस इ.चे पुराण साहित्य तृतीय क्रमांकाचे प्रमाण ग्रंथ आहेत असे म्हणावे लागेल.
या प्रकारे शरणांच्या वचनांच्या आधारे आचरण आणि विचार करणारेच खरे लिंगायत आहेत असे शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी आपल्या वचनात म्हणले आहे.
आमच्या आचरणास आमच्या पूर्व पुरातनांचे सांगणेच इष्ट आहे.

स्मृती समुद्रात जाऊ घा, श्रुती वैकुंठात राहू घा

पुराण अग्नीत जाऊ घा, आगम वायूत जाऊ घा

आमुच्या शरणांचे वचन कपिलसिद्धमल्लिकार्जुन

महालिंगाच्या हृदयात ग्रंथित होऊ घा

आमच्या एका वचनाच्या पारायणास

व्यत्साचे एक पुराण पारायण होई न सम

आमचे एकशे आठ वचनांच्या अध्ययनास

शत रूद्रादि असे न सम

सोलापूरचे सिद्धरामेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे लिंगायतांज्या आचार व विचाराला शरणांचे वचनेच आधार शास्त्र होय. लिंगायत धर्मानुयायांनी वचनांचे पारायण आणि अध्ययन करावयास हवे. असे अध्ययन केल्यास त्याचे फळ म्हणून स्वतंत्रपणे विचार करण्याची शक्ती प्राप्त होते. सत्यार्थ निर्णय घेताना शास्त्र प्रमाणापेक्षा स्वानुभव प्रमाणाच श्रेष्ठ मानून लिंगायतांनी विश्वास ठेवावा. या कारणे मुढ संप्रदत्यापेक्षा सत्य हेच श्रेष्ठ समजून स्वतंत्रपणे विचार करणाराच खरा लिंगायत होय.

आमुच्या एक हजार वचनांच्या पारायणास

गायत्रीचे एक लक्ष जप न होई समान

कपिलसिद्ध मल्लिकार्जुन (शिवयोगी सिद्धरामेश्वर व. ८५९)

योग समाधी

संपादन

संदर्भ

संपादन
  1. कबीर और बसवेश्वर तुलनात्मक अध्ययन (हिंदी, लेखक - डॉ. शंकरराव कप्पीकेरी)
  2. बसवबोध (बसवेश्वरांचे तत्त्वज्ञान, मूळ कन्नडा, मराठी अनुवाद डॉ. इरेश सदाशिव स्वामी)
  3. महात्मा बसवेश्वर - कार्य आणि कर्तृत्त्व (मराठी, लेखक - सुभाष देशपांडे)
  4. महात्मा बसवेश्वर आणि शरणकार्य (लेखक - डॉ. अशोक प्रभाकर कामत)
  5. बसवेश्वर - काव्यशक्ति और सामाजिक शक्ति (हिंदी, लेखक - काशीनाथ अंबलगे)
  6. बसवेश्वर (इंग्रजी, लेखक - अनंत पै)
  7. वीरशैव तत्त्वज्ञान (मराठी, लेखक - सुधाकर देशमुख)

सिद्धरामेश्वरील पुस्तके

संपादन
  • १) श्री सिद्धरामेश्वर आरती संग्रह (श्री. सिद्रामप्पा कल्लप्पा हुलसुरे, सोलापूर )
  • २) श्री सिद्धरामेश्वरानी स्थापन केलेले सोलापुरातील अष्टविनायक ( श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी, सोलापूर)
  • ३) शिवकुंजातील सिद्धफुले -( मराठी, लेखक - श्री. शि. श. माशाळ )
  • ४) शिवयोगी सिद्धरामेश्वर - (मराठी, लेखक - श्री. दा. का. थावरे)
  • ५) कथा श्रीसिद्धरामांच्या - (मराठी, लेखक - शांता मरगूर )
  • ६) शरण जीवन दर्शन (मराठी, लेखक - श्री. राजू ब. जुंबरे )
  • ७) सोलापूर जिल्याहयाचा इतिहास मराठा कालखंड - (मराठी, लेखक - श्री. गोपाळ देशमुख)

बसवेश्वरांवरील पुस्तके

संपादन
  • कबीर और बसवेश्वर तुलनात्मक अध्ययन (हिंदी, लेखक - डॉ. शंकरराव कप्पीकेरी)
  • बसवबोध (बसवेश्वरांचे तत्त्वज्ञान, मूळ कानडी, मराठी अनुवाद डॉ. इरेश सदाशिव स्वामी)
  • महात्मा बसवेश्वर - कार्य आणि कर्तृत्त्व (मराठी, लेखक - सुभाष देशपांडे)
  • महात्मा बसवेश्वर आणि शरणकार्य (लेखक - डॉ. अशोक प्रभाकर कामत)
  • बसवेश्वर - काव्यशक्ति और सामाजिक शक्ति (हिंदी, लेखक - काशीनाथ अंबलगे)
  • बसवेश्वर (इंग्रजी, लेखक - अनंत पै)
  • वीरशैव तत्त्वज्ञान (मराठी, लेखक - सुधाकर देशमुख)
  • आधुनिकतेचे अग्रदुत : महात्मा बसवेश्वर (मराठी, लेखक - डॉ. राजशेखर सोलापुरे)
  • लिंगायत एक स्वतंत्र धर्म (मराठी, लेखक - डॉ. राजशेखर सोलापुरे)

संदर्भ

संपादन
  1. ^ सोलापुरे, राजशेखर. महात्मा बसवेश्वरांच्या राजकीय विचार व कार्याची प्रासंगिकता :एक चिकित्सक अभ्यास.

बाह्य दुवे

संपादन


श्री सिद्धरामेश्वरांनी एकूण १६७९ वचने लिहिलेली आहेत.