सिताबर्डीचा किल्ला
(सिताबर्डी (नागपूर) या पानावरून पुनर्निर्देशित)
सिताबर्डी हा महाराष्ट्रातील नागपूर शहरातील किल्ला आहे. येथील टेकडीचे रूपांतर ईंग्रजांनी किल्ल्यात केले.या किल्ल्यावर तोफखाना व दारुगोळा असे.या किल्ल्यावर तेंव्हा अरब सेनेने हल्ला चढविल्याची नोंद आहे.हा किल्ला नंतर लष्कराच्या ताब्यात देण्यात आला.
वर्षात फक्त तिनदा, २६ जानेवारी व १५ ऑगस्ट व १ मे रोजी याचा काही भाग जनतेसाठी खुला करण्यात येतो.या किल्ल्याचे बांधकाम काळ्या दगडात आहे.
सीताबर्डी शब्दाचा अर्थ सितेची टेकडी असा होतो.