सावरकर साहित्य अभ्यास मंडळ
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. |
सावरकर अभ्यास मंडळ, डोंबिवली (ठाणे जिल्हा) याची स्थापना सावरकर प्रेमी टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाने सन २००० साली केली. सावरकरांच्या वाङ्मयाचा व त्यांच्या चरित्राचा सखोल अभ्यास करून त्यांच्या विचारांचा राष्ट्रावर प्रभाव पडावा व आपले राष्ट्र सावरकर विचारांच्या प्रेरणेतून परम वैभवाला गेले पाहिजे या पवित्र हेतूने हे अभ्यास मंडळ स्थापण्यात आले. त्यातूनच सन २००० या सालापासून सावरकरांवर विशेष अभ्यास करणाऱ्या व त्याप्रमाणे आचरण करणाऱ्या व्यक्तीचा वीर सावरकर सेवा पुरस्कार देऊन सत्कार करण्याचे मंडळाने ठरविले.
इ.स.२००० सालापासून असे दिलेले पुरस्कार
संपादन- २००० : अवधूत शास्त्री
- २००१ : कर्नल श्याम चव्हाण
- २००२ : विक्रम सावरकर
- २००३ : अरविंद कुलकर्णी
- २००४ : वा.ना. उत्पात
- २००५ : ज.द. जोगळेकर
- २००६ : पुरस्कार नाही
- २००७ : डॉ. अरविंद गोडबोले
- २००८ : सुधाकर देशपांडे
- २००९ : सूर्यकांत पाठक
- २०१०: मिलिंद एकबोटे
मुंबईतले स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ
संपादन२६ फेब्रुवारी १९६६ रोजी प्रारयोपवेषनाने आत्मार्पण केल्यानंतर पुढील वर्षीच १० एप्रिल १९६७ च्या गुढीपाडव्याच्या शुभदिनी ‘सावरकर सदन’मध्ये ‘स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई’ या संस्थेची स्थापना झाली. सावरकरांचे स्वीय साहाय्यक कै. शांताराम शिवराम तथा बाळराव सावरकर यांनी पुढाकार घेऊन सावरकरांच्या तेजस्वी आणि राष्ट्रोधारक साहित्याच्या माध्यमातून अभिजात निरपेक्ष देशभक्तीचा वारसा भावी पिढ्यांना मिळत रहावा, त्याचा प्रसार आणि प्रचार सातत्याने अखंड होत रहावा, या मुख्य उद्देशाने प्रेरित असलेल्या संस्थेची स्थापना व्हावी, अशा विचारांची संकल्पना बैठकीत सादर केली.
या बैठकीस रा.म. आठवले, अंनत काणेकर, दत्तप्रसन्न काटदरे, अप्पा कासार, प्रा. व.दि. कुलकर्णी, के.वि. घारपुरे, दि.वि. गोखले, विद्याधर गोखले, शं.द. गोखले, ज.द. जोगळेकर, पुण्याचे शंकरराव तथा मामा दाते, सुधीर फडके, प्रा. सं.ग. मालशे आदी विचारवंत आणि सावरकरप्रेमी मंडळी उपस्थित होती. बैठकीत श्री. रा.म. आठवले यांनी वरील संस्था स्थापन व्हावी, असा ठराव मांडला आणि संस्थेच्या स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली गेली.
हे मुंबईचे सावरकर साहित्य अभ्यास मंडळ नित्यनियमाने सावरकर साहित्य संमेलन भरवते. २०१३ साली २५वे रौप्य महोत्सवी संमेलन नाशिक येथे भरले होते.
पुण्यातील सावरकर मंडळ
संपादनपुण्यामध्ये निगडी या उपनगरात ’स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ’ नावाची संस्था आहे. संस्थेचे एक ग्रंथालय आहे. त्याशिवाय ही संस्था व्याख्याने आदी अनेक उपक्रम राबविते.
कलकत्यातील वीर सावरकर फाउंडेशन
संपादनकलकत्यातील वीर सावरकर फाउंडेशन नावाची संस्था नियमितपणे वीर सावरकर पुरस्कार देते. २००९साली हा पुरस्कार हरींद्र श्रीवास्तव यांना, २०११साली जॉन जेकब यांना तर २०१२साली प्रा. बलराज मधोक यांना.
पहा :साहित्य संमेलने