सामाजिक अंतरण
सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग ), किंवा शारीरिक अंतरण हे संसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी केलेले उपाय होत. यात मोठ्या गटात एकत्र जमणे टाळणे, दोन व्यक्तींमध्ये सहा फूट किंवा एक मीटर इतके विशिष्ट अंतर कायम ठेवणे, इ.चा समावेश होतो.[१] संसर्ग न झालेल्या व्यक्तीने संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शारीरिक संपर्कात येण्याची शक्यता कमी करून रोगाचा प्रसार कमी करता येतो. परिणामी रोगाने होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी होते.[२] या उपाययोजनेच्या बरोबरच श्वसनाचे आरोग्य आणि हात धुणे यासारखे उपायसुद्धा अंमलात आणले जातात.[३] २०१९-२० च्या कोव्हिड रोगाच्या उद्रेकादरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने 'सामाजिक' अंतरणाच्या ऐवजी 'शारीरिक अंतरण' असा शब्द वापरण्यास सुचवले. शारीरिक अंतरणामुळे रोगप्रसार कमी करता येतो, आणि या काळातसुद्धा समाज माध्यमांद्वारे लोक सामाजिकदृष्ट्या जोडलेले राहू शकतात, अशी यामागची भावना आहे.
संसर्गजन्य रोगाचा प्रसार रोखण्याच्या प्रयत्नात मानवी सामाजिक संवाद कमी करणे | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | social behavior, activity policy | ||
---|---|---|---|
उपवर्ग | non-pharmaceutical countermeasure | ||
ह्याचा भाग | infection control | ||
भाग | |||
पासून वेगळे आहे |
| ||
| |||
संसर्गजन्य रोगांचा प्रसार कमी करण्यासाठी आणि आरोग्यसेवांवरचा ताण वाढू नये म्हणून, विशेषतः साथीच्या रोगाच्या वेळी, शाळा आणि कार्यालये बंद करणे, अलगीकरण, विलगीकरण, लोकांची हालचाल प्रतिबंधित करणे आणि लोकांनी एकत्र येण्यास बंदी घालणे (जमावबंदी) यासह सामाजिक अंतरणाचे अनेक उपाय अमलात आणले जातात. [४][५]
आधुनिक काळात अनेक सार्वत्रिक साथींमध्ये सामाजिक अंतरणाचे उपाय यशस्वीरित्या अंमलात आणले गेले आहेत. सेंट लुईसमध्ये, १९१८ मधील फ्लूच्या साथीच्या काळात शहरात इन्फ्लूएंझाची पहिली घटना आढळल्यानंतर लगेचच अधिकाऱ्यांनी शाळा बंदी, सार्वजनिक मेळाव्यांवरील बंदी आणि अन्य सामाजिक अंतरण उपायांची अंमलबजावणी केली. फिलाडेल्फियाच्या तुलनेत सेंट लुईसमधील मृत्यूंचे प्रमाण फारच कमी होते, पण तिथे इन्फ्लूएंझाची प्रकरणे असूनही, सामूहिक परेड चालू ठेवण्यास परवानगी मिळाली आणि पहिल्या घटनेनंतर दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळपर्यंत सामाजिक अंतरणाची अंमलबजावणी केली गेली नाही. २०१९-२०२० च्या कोरोनव्हायरसच्या जागतिक साथीच्या काळात सध्या जगातील अनेक देशांमध्ये सामाजिक अंतरणाचे उपाय योजण्यात येत आहेत.[६]
जेव्हा संसर्गजन्य रोग खोकला किंवा शिंकणे याद्वारे उडणाऱ्या थेंबांद्वारे किंवा लैंगिक संपर्कासह थेट शारीरिक संपर्क, अप्रत्यक्ष शारीरिक संपर्क (उदा. दूषित पृष्ठभागाला स्पर्श करून); किंवा हवेद्वारे प्रसारित (जर सूक्ष्मजीव हवेत दीर्घ काळासाठी टिकू शकत असेल तर) होत असेल तर सामाजिक अंतरण ठेवण्याचे उपाय अधिक प्रभावी ठरतात;[७] जेव्हा संसर्ग प्रामुख्याने दूषित पाणी किंवा अन्नाद्वारे किंवा डास किंवा इतर कीटकांसारख्या प्रसारकाद्वारे संक्रमित होत असतो तेव्हा असे उपाय कमी प्रभावी असतात. [८]
सामाजिक अंतरणाचे तोटे म्हणजे एकटेपणा, उत्पादकता कमी होणे आणि मानवी संवादाशी असलेले इतर फायदे न मिळणे.[९]
व्याख्या
संपादनरोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राने(सीडीसी) सामाजिक अंतरणाचे असे वर्णन केले आहे की "रोगाचा प्रसार होण्याचा धोका कमी करण्यासाठी लोकांमधील संपर्काची वारंवारता आणि जवळीक कमी करण्याच्या पद्धतींचा” एक गट. २०१९- २०२० च्या कोरोनाव्हायरसच्या जागतिक साथीच्या काळात "लोकांच्या मेळाव्यापासून दूर राहणे, मोठ्या संख्येने एकत्र जमणे टाळणे आणि जितके शक्य असेल तितके इतरांपासून अंतर (अंदाजे सहा फूट किंवा दोन मीटर) राखणे" अशी या व्याख्येत सुधारणा करण्यात आली.[१०][११]
यापूर्वी, २००९ मध्ये फ्लूच्या जागतिक साथीच्यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने सामाजिक अंतरणाचे वर्णन ‘इतरांपेपासून कमीतकमी एक हात इतके अंतर ठेवणे, आणि मेळावे कमी करणे’ असे केले होते. यासह श्वसनाची चांगली स्वच्छता आणि हात धुणे हेसुद्धा केले जाते आणि साथीचा रोग कमी करण्याचा किंवा त्याच्या प्रसाराचा वेग कमी करण्याचा हा सर्वात व्यवहार्य मार्ग मानला जातो. [१२]
संदर्भ
संपादन- ^ आंधळे, संतोष. "सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?". marathi.abplive.com. ३० मार्च २०२० रोजी पाहिले.
- ^ "Social distancing could buy U.S. valuable time against coronavirus - The Washington Post". web.archive.org. रोजी मूळ पानापासून संग्रहित2020-03-27. 2020-04-19 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "Pandemic influenza prevention and mitigation in low resource communities" (PDF). WHO. line feed character in
|title=
at position 52 (सहाय्य) - ^ "समजून घ्या सहजपणे : मुंबईत जमावबंदी लागू झाली म्हणजे नेमकं काय?". Loksatta. 2020-04-21 रोजी पाहिले.
- ^ "दहावीच्या भूगोलाच्या पेपरसह नववी आणि आकरावीच्या परीक्षाही रद्द, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा". Divya Marathi. 2020-04-21 रोजी पाहिले.
- ^ Ryan, Jeffrey R. (2008-08-01). Pandemic Influenza: Emergency Planning and Community Preparedness (इंग्रजी भाषेत). CRC Press. ISBN 978-1-4200-6088-1.
- ^ Public health department, Santa Clara valley health and hospital system. "Information about social distancing" (PDF). https://www.cidrap.umn.edu/. 2020-04-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2020-04-21 रोजी पाहिले. External link in
|journal=
(सहाय्य) - ^ "Interim Pre-pandemic Planning Guidance: Community Strategy for Pandemic Influenza Mitigation in the United States— Early, Targeted, Layered Use of Nonpharmaceutical Interventions" (PDF). https://www.cdc.gov/flu/pandemic-resources/pdf/community_mitigation-sm.pdf. २१ एप्रिल २०२० रोजी पाहिले. line feed character in
|title=
at position 40 (सहाय्य); External link in|संकेतस्थळ=
(सहाय्य) - ^ Samantha K Brooks, Rebecca K Webster, Louise E Smith, Lisa Woodland, Simon Wessely, Neil Greenberg, Gideon James Rubin. "The psychological impact of quarantine and how to reduce it: rapid review of the evidence". https://www.thelancet.com/action/showPdf?pii=S0140-6736%2820%2930460-8. २१ एप्रिल २०२० रोजी पाहिले. External link in
|संकेतस्थळ=
(सहाय्य)CS1 maint: multiple names: authors list (link) - ^ March 13, Katie Pearce / Published; 2020. "What is social distancing and how can it slow the spread of COVID-19?". The Hub (इंग्रजी भाषेत). 2020-04-23 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ CDC. "Risk Assessment and Management". Centers for Disease Control and Prevention (इंग्रजी भाषेत). 2020-04-23 रोजी पाहिले.
- ^ WHO. "Pandemic influenza prevention and mitigation in low resource communities" (PDF). https://www.who.int/csr/resources/publications/swineflu/PI_summary_low_resource_02_05_2009.pdf?ua=1. २३ एप्रिल २०२० रोजी पाहिले. line feed character in
|title=
at position 52 (सहाय्य); External link in|संकेतस्थळ=
(सहाय्य)