साबुदाण्याची लापशी
(साबूदाण्याची खीर या पानावरून पुनर्निर्देशित)
साहित्य
संपादन- १ टेबल चमचा साबुदाणा
- १ कप दूध
- २ चमचे साखर.
कृती
संपादनसाबुदाणा थोडावेळ धुऊन ठेवावा, नंतर १/२ कप पाण्यात साबुदाणा शिजवून घ्यावा. वाटल्यास थोडेसे आणखी पाणी घालावे. नंतर त्यात दूध व साखर घालून थोडा वेळ शिजवावे. मग खालती उतरवून गार किंवा गरम आवडी प्रमाणे द्यावी. आयत्यावेळी त्यात चिमूटभर मीठ घातल्यास ही लापशी चांगली लागते.
संदर्भ
संपादनhttp://www.marathiworld.com/ann-he-purnabramha-m/sabudanakhichadi