सान होजे देल काबो हे मेक्सिकोच्या बाशा कॅलिफोर्निया सुर राज्याच्या दक्षिण टोकावर वसलेले शहर आहे. जवळील काबो सान लुकास सह हे शहर बाशा कॅलिफोर्नियातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक आहे. २०११मध्ये येथे सुमारी ९,००,००० पर्यटकांनी भेट दिली होती.[] २०१० च्या जनगणनेनुसार येथील वस्ती ६९,७८८ होती.[]

या शहराची स्थापना मिझियाँ एस्तेरो दे लास पाल्मास दे सान होजे देल काबो अन्युइती नावाने इ.स. १७३० मध्ये झाली. कॅलिफोर्निया व मेक्सिकोतून फिलिपाइन्सला येजा करणारी जहाजे येथे थांबून जवळील रियो सान होजे या नदीतून गोडे पाणी भरून घेत असत.[]

लोस काबोस आंतरराष्ट्रीय विमानतळ या शहरास व बाहा कालिफोर्निया सुर राज्याला विमानसेवा पुरवतो.

वस्तीविभागणी

संपादन
ऐतिहासिक लोकसंख्या
वर्ष लोक. ±%
इ.स. १९९० १३,३०२
इ.स. १९९५ २१,७३७ +६३%
इ.स. २०००
इ.स. २००५
इ.स. २०१० ६९,७८८
[]

हवामान

संपादन

बाशा कालिफोर्नियातील इतर भागांप्रमाणे सान होजे देल काबोचे हवामान अतिकोरडे आहे. पूर्व प्रशांत महासागरातील हरिकेन वादळे अनेकदा येथे थडकतात. अशावेळी येथे अतिप्रचंड प्रमाणात पाउस पडतो. १ सप्टेंबर, १९९८ रोजी एका दिवसात येथे ३४० मिमी तर ३ नोव्हेंबर, १९९३ रोजी ३१६ मिमी पाउस पडला. असे असताही सतत अनेक वर्षे येथे पाउस न पडल्याची उदाहरणेही आहेत. येथील समुद्राचे पाणी हिवाळ्यात २२-२३ °सेल्शियस तर उन्हाळ्यात २५-२९ °सेल्शियस इतके गरम असते.[]

सान होजे देल काबो साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 37.0
(98.6)
38.0
(100.4)
39.0
(102.2)
39.0
(102.2)
40.0
(104)
48.0
(118.4)
49.0
(120.2)
42.0
(107.6)
42.0
(107.6)
41.0
(105.8)
40.0
(104)
39.0
(102.2)
49.0
(120.2)
सरासरी कमाल °से (°फॅ) 25.8
(78.4)
26.4
(79.5)
27.4
(81.3)
29.1
(84.4)
30.9
(87.6)
32.6
(90.7)
33.8
(92.8)
33.9
(93)
33.4
(92.1)
32.3
(90.1)
30.1
(86.2)
26.9
(80.4)
30.2
(86.4)
दैनंदिन °से (°फॅ) 18.9
(66)
19.2
(66.6)
20.1
(68.2)
21.9
(71.4)
24.0
(75.2)
26.5
(79.7)
28.5
(83.3)
28.9
(84)
28.2
(82.8)
26.2
(79.2)
23.2
(73.8)
20.2
(68.4)
23.8
(74.8)
सरासरी किमान °से (°फॅ) 12.0
(53.6)
12.0
(53.6)
12.8
(55)
14.8
(58.6)
17.1
(62.8)
20.5
(68.9)
23.3
(73.9)
23.8
(74.8)
23.0
(73.4)
20.1
(68.2)
16.3
(61.3)
13.4
(56.1)
17.4
(63.3)
विक्रमी किमान °से (°फॅ) 1.5
(34.7)
5.0
(41)
5.0
(41)
6.0
(42.8)
10.0
(50)
11.0
(51.8)
11.5
(52.7)
11.0
(51.8)
11.0
(51.8)
11.0
(51.8)
9.5
(49.1)
6.0
(42.8)
1.5
(34.7)
सरासरी पर्जन्य मिमी (इंच) 13.1
(0.516)
5.3
(0.209)
1.3
(0.051)
1.0
(0.039)
0.3
(0.012)
0.9
(0.035)
20.5
(0.807)
53.6
(2.11)
112.5
(4.429)
42.9
(1.689)
25.2
(0.992)
11.4
(0.449)
288.0
(11.339)
सरासरी पावसाळी दिवस 1.4 0.6 0.2 0.1 0.0 0.1 1.4 3.0 3.9 2.0 0.8 1.1 14.6
स्रोत: Servicio Meteorológico National[]
समुद्रातील पाण्याचे सरासरी तपमान
जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर
73 °F

23 °C

72 °F

22 °C

72 °F

22 °C

72 °F

22 °C

73 °F

23 °C

77 °F

25 °C

81 °F

27 °C

84 °F

29 °C

84 °F

29 °C

84 °F

29 °C

81 °F

27 °C

77 °F

25 °C

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Ranking of World Tourism" (PDF) (स्पॅनिश भाषेत). 2011. p. 2. 2022-02-24 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 3 September 2012 रोजी पाहिले.
  2. ^ "San Jose del Cabo". Censo de Población y Vivienda 2010 (स्पॅनिश भाषेत). INEGI. 3 September 2012 रोजी पाहिले.
  3. ^ Encyclopædia Britannica, Second edition, 1778, Edinburgh, page 1580. Scan of page can be found at http://www.hyzercreek.com/britannica.htm
  4. ^ http://www.inegi.org.mx/sistemas/TabuladosBasicos/LeerArchivo.aspx?ct=993&c=16762&s=est&f=1
  5. ^ http://www.myweather2.com/City-Town/Mexico/San-Jose-Del-Cabo/climate-profile.aspx?month=12
  6. ^ "Normales climatológicas 1951-2010. Estado: Baja California Sur. Estacion: San Jose del Cabo" (Spanish भाषेत). Servicio Meteorológico Nacional. 2016-03-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 17, 2013 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)