सान मटेओ काउंटी (कॅलिफोर्निया)

(सान मटेओ काउंटी, कॅलिफोर्निया या पानावरून पुनर्निर्देशित)

सॅन मटेओ काउंटी ( /ˌsæn məˈt./) ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक काउंटी आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७,६४,४४२ होती. [] या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र रेडवूड सिटी येथे आहे. [] डेली सिटी आणि सान मटेओनंतर ही येथील इतर दोन मोठी शहरे आहेत. सान मटेओ काउंटीचा समावेश सान फ्रान्सिस्को-ओकलँड-बर्कले मध्ये होतो. ही काउंटी सिलिकॉन व्हॅलीमध्ये आहे. सान फ्रान्सिस्को खाडी या काउंटीला लागून आहे. सान फ्रान्सिस्को द्वीपकल्पाचा मोठा भाग या काउंटीत आहे. सान फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ या काउंटीच्या ईशान्य भागात आहे. या काउंटीमध्ये अनेक मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांची मुख्यालये आहेत.

सांताक्रुझ टेकड्या सान मटेओ काउंटीच्या पश्चिमेस आहे.

विमानतळ

संपादन

सान फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ सान मटेओ काउंटीमध्ये असला तरीही त्याची मालकी सान फ्रान्सिस्को शहर आणि काउंटीकडे आहे.

संदर्भ

संपादन
  1. ^ "San Mateo County, California". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. January 30, 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.