सान्तियागो दे क्युबा
(सान्टियागो, क्युबा या पानावरून पुनर्निर्देशित)
सान्तियागो दे क्युबा हे क्युबाच्या याच नावाच्या प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. देशाच्या आग्नेय भागात असलेले हे शहर क्युबातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. २००४ च्या जनगणनेुसार शहराची लोकसंख्या ५,०९,१४३ तर महानगराची लोकसंख्या १०,४९,०८४ होती.
या शहराची स्थापना दियेगो वेलाझक्वेझ दे क्वेयारने २५ जुलै, १५१५ रोजी केली होती.