Commons-emblem-notice.svg
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


गौस सादिक शाहबाबा हे बाणेर गावचे सुफी संत होते. बाबांचा जन्म ११ जून १९१४ रोजी तमिळनाडूमधे झाला. बाबा लहान असताना त्यांना देवभक्तीची अतिशय आवड होती. हळूहळू ते भगवान् शंकराची उपासना करू लागले; भजन कीर्तनही करायचे. मग त्यांच्या गुरूंनी त्यांना योग्य मार्गदर्शन करून वयाच्या २५ व्या वर्षी विद्या प्रदान केली. मग तर बाबांनी असे चमत्कार् केले की जनलोक थक्क झाले. आणि जे लोक त्यांच्या कर्तव्यापासून दूर् होते त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन दिली. असे करीत करीत बाबांनी लोकांना आपल्या सामर्थ्याने रोजगार व ज्यांनां संतान नाही त्यांना तेही मिळवून दिले. व ज्यांना पिशाच पीडा होती त्यांनाही त्यातून मुक्त केले. असे करत करत बाबांनी लोकांच्या मनावर अधिराज्य केले. हळूळू बाबांच्या दरबारात दूर् देशाततून लोक आले. अनेकांचे मन बाबांनी जिंकले.

भाद्रपद शुद्ध प्रतिपदा, रमझान ईद १९७८ ला बाबा समाधिस्त झाले. पण आजही त्यांची समाधी आपल्या भक्तांशी निर्गुणपणे संवाद करत आहे.