साच्यांमधील शुद्धलेखनदुरुस्त्या

संपादन

साच्यांमधील शुद्धलेखनात चुका आढळल्यास, त्या जर दृश्य मजकुरापुरत्या असतील, तर थेट सुधाराव्यात; मात्र त्या जर पॅरामीटरांमध्ये हव्या असतील, तर त्या चर्चापानावर मांडाव्यात. याचे कारण असे, की पॅरामीटरांमध्ये थेट दुरुस्ती/ बदल केल्यास, जिथे-जिथे साचा वापरला गेला आहे, तिथे-तिथे पॅरामीटराचे जुने नाव व प्रत्यक्ष साच्यातील दुरुस्त पॅरामीटर यांच्यांत तफावत असल्यामुळे साच्याचे पार्सर गंडतात. त्यामुळे साचे वापरलेल्या पानांवर माहिती दिसत नाही, किंवा त्रुटींसह दिसतात. त्यामुळे पॅरामीटरांतील दुरुस्त्या सांगकाम्ये लावून कराव्या लागतात. म्हणून, पॅरामीटर-विषयक दुरुस्त्या चर्चापानावर नोंदवाव्यात.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०९:१६, ११ जुलै २०११ (UTC)

"व्यक्ती" पानाकडे परत चला.