नमस्कार विकएडीट ओळख

आपण एकाचवेळी विकिपीडिया आणि फायरफॉक्स उपयोगकर्ते असाल तर विकिपीडियातील संपादने अधीक सुलभकरण्याकरिता विकएडीट 1.4.0 या फायरफॉक्स ऍड ऑन वापरण्याचा विचार करावा हि नम्र विनंती.

विकएडीट 1.4.0 या फायरफॉक्स ऍड ऑन आपणास आंतरजालावर कुठेही काही आढळलेतर तो मजकुर विकिपीडीया आणि विकिसहप्रकल्पातून सहज शोधण्यासच मदत करत नाही तर संबंधीत विषयावरील एखादा लेख सरळ संपादनाकरिता उघडता येतो. नेहमी लागणार्‍या संपादन सुविधा तुम्हाला तुमच्या माऊसच्या उजव्या टिचकीवर उपलब्ध होतात.

  1. नेहमी लागणारी बदलांच्या आधाव्यातील वाक्ये सहज साठवून सहज वापरता येतात
  2. एखाद्या शब्दाच्या उजवीकडे आणि डावीकडे नेहमी द्यावा लागणारा मजकुर एका टिचकीत चिटकवता येतो
  3. साचात नेहमी लागणार्‍या आज्ञावली सहज साठवून सहज वापरता येतात.