साचा:दालन महाराष्ट्र शासन विशेष लेख

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ

संपादन
स्पेन
स्पेन

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असून, राज्यभरात गोदामांचे जाळे निर्माणकरुन औद्योगीक व कृषी क्षेत्रास साठवणुकीची सुविधा पुरविण्यासाठी या महामंडळाची निर्मीती केलेली आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ८ ऑगस्ट १९५७ ला “ॲग्रिकल्चर प्रोडयूस (डेव्हलपमेंट ॲण्ड वेअरहाउसिंग) कॉर्पोरेशन ॲक्ट १९५६” अन्वये स्थापन झाले.सन १९६२ मध्ये “द वेअरहाउऊसिंग कॉर्पोरेशन ॲक्ट १९६२” पारित झाल्यानंतर, १९५६ चा कायदा रद्द झाला असून आता हे महामंडळ १९६२ च्या कायद्यान्वये कार्यरत आहे.

संरचना

संपादन
  • महामंडळाचे भाग भांडवल - महाराष्ट्र शासन ५०% + केंद्रीय वखार महामंडळ ५०%
  • एकूण मंजूर भाग भांडवल - रु.१५.०० कोटी
  • प्राप्त भाग भांडवल - रु.८.७१ कोटी

वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन ॲक्ट १९६२ च्या तरतुदीप्रमाणे महामंडळ संचालक मंडळाच्या अखत्यारीत काम करते.
या संचालक मंडळात केंद्रीय वखार महामंडळ व महाराष्ट्र शासन यांनी नामनिर्देशित केलेले प्रत्येकी पाच संचालक असतात.

पुढे वाचा...