साचा:तरसोद-गणपती मंदिर

         जळगाव शहरापासून केवळ ६ कि.मी. (पूर्वेस) अंतरावर असलेल्या "तरसोद" गावी श्री.गणपतीचे पेशवेकालीन मंदिर आहे. पूर्वीपासूनच हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने, संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर, बाहेरील राज्यातून भाविकांची दर्शनासाठी ओढ असते. शेगाव संस्थानात सापडलेल्या पुरातन नोंदीनुसार, पूर्वी शेगावचे "श्री.गजनाज महाराज" शिर्डीचे "श्री.साईबाबा" आणि तरसोद मंदिराच्या पूर्वेस ३ कि.मी.वर वसलेल्या नशिराबाद येथील "श्री.झिपरू अण्णा" हे तिन्ही महापुरुष "तरसोद गणपती मंदिर" येथे नेहमी एकमेकांना भेटत असत ! नमूद नोंदीनुसार हे तिन्ही महापुरुष समकालीन असल्याने, तसेच तरसोद-गणपती मदिर त्यांचे अत्यंत प्रिय ठिकाण असल्याने, या ठिकाणी तिन्ही महापुरुषांना बऱ्याचदा गावातील लोकांनी एकत्र बघितल्याचे अनेक पुरावे आहेत. 
        अशा ठिकाणी, भाविकांच्या नवसाला पावनाऱ्या "श्री.गणपती" चे दर्शन घेण्यासाठी, भाविकांची दर चतुर्थीला प्रचंड गर्दी होत असते...!