महाराष्ट्राच्या पेण, उरण आणि पनवेल या तालुक्यांतील प्रामुख्याने आगरी समाजात साखरचौथ गणेशोत्सव साजरा केला जातो. अनंत चतुर्दशीनंतर चार पाच दिवसांनी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला (साखर चतुर्थीला) गणेशमूर्तींची स्थापना होते. दुसऱ्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. काही साखरचौथ गणपती अडीच ते पाच दिवसांचेही असतात. या साखरचौथीला बसणाऱ्या गणपतींना गौरा गणपती असेही म्हणतात.

याचवेळी २१ दिवसांचे काही गणपतीही या उत्सवात असतात. पनवेल शहरात एकूण ६८ साखरचौथ गणपती आहेत. २२ सार्वजनिक मंडळेही आहेत.