सांभर तलाव

भारतातील मीठ तलाव

सांभर तलाव हा भारतातील जयपूरपासून ९६ किमी नैर्ऋत्येला आणि अजमेरपासून ६४ किमी पूर्वेला महामार्ग क्रमांक ८ वर आहे. हा भारतातील सर्वात मोठा खार्‍या पाण्याचा तलाव आहे. जवळच सांभार लेक टाऊन नावाचे गाव आहे. समुद्रसपाटीपासून हे ठिकाण १२०० फूट उंचीवर आहे. जेव्हा भरलेले असते तेव्हा या तलावाचे क्षेत्रफळ ९० चौरस किलोमीटर असते. या तलावाला तीन नद्या येऊन मिळतात.

या तलावातील पाण्यापासून मोठ्या प्रमाणात मीठ मिळते. या मिठाला आयुर्वेदात रोमक मीठ म्हणतात. अरवली पर्वताच्या दर्‍यांमधील गाळ हा या मिठाचा उगम आहे. नदीबरोबर हे मीठ तलावात येते.

पौराणिक उल्लेखसंपादन करा

महाभारतानुसार हे क्षेत्र वृषपर्वा या असुर राजाच्या साम्राज्याचा एक भाग होते. शुक्राचार्य यांची कन्या देवयानी हिचा [ययाती]]शी विवाह याच भागात झाला. या सांभार टाऊन गावात देवयानीचे एक देऊळ आहे. तसेच एक शाकंभरी देवीचे मंदिरही आहे.