सांध्यपर्वातील वैष्णवी (काव्यसंग्रह)
सांध्यपर्वातील वैष्णवी हा मराठी कवी माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचा चौथा काव्यसंग्रह होय. इ. स. १९९५ मध्ये त्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
अर्पणपत्रिका
संपादनया संग्रहात अर्पणपत्रिकेवर ॥ अर्पणपत्रिका ॥ असा स्पष्ट उल्लेख आहे. आईचा पिंड स्पर्शून गेलेल्या कावळ्याला ग्रेस यांनी हा काव्यसंग्रह अर्पण केलेला आहे. आपल्या लेखनात त्यांनी इतरत्रही "पक्षियांचा राणा कावळाचि" अशी घोषणा केलेली आहे.
परिचय
संपादनअर्पणपत्रिकेआधी केलेल्या आत्मनिवेदनात ग्रेस यांनी ते आत्मनिवेदन 'वैष्णवी'पुढे केलेले आहे अशी भूमिका मांडलेली आहे. आपल्या काव्यप्रवासातील वैष्णवीचे महत्त्वही त्यांनी निवेदनात उलगडून दाखविले आहे. प्रार्थनापर्व, सांध्यपर्व आणि दृष्टांतपर्व अशा तीन पर्वांमध्ये हा काव्यसंग्रह विभागलेला आहे.