सहाय्य:माहितीचौकट
साचा:WikiProject Infoboxes sidebar
'माहितीचौकट' ही एक निश्चित-पारूपणाची सारणी आहे जी लेखाच्या उजव्या बाजूच्या वरचे भागात जोडली जाते. त्याचा उद्देश हा, काही एकत्रित केलेली महत्त्वाची माहिती एकाच जागी दर्शविणे अथवा काही तत्संबंधित दुव्यांशी दुवा जोडणे अथवा सुचालनास बळकटी देणे असा असतो.अनेक माहितीचौकटी ह्या बांधीव मेटाडाटा प्रसृत करतात.त्यांचा स्रोत DBpedia व इतर तृतियपक्षाचे वापरकर्ते असतात.माहितीचौकटीचे सामान्यिकृत प्रारूपण हे जीवचौकटीतून उद्भवले, (जीवचौकट) ज्यांचा वापर हा, जीवांचे विज्ञानात्मक वर्गीकरण दृश्य स्वरूपात करण्यास विकसित केल्या गेला. माहितीचौकटीचा वापर हा कोणत्याही लेखासाठी आवश्यक किंवा प्रतिबंधित नसतो.एखादी माहितीचौकट वापरायची काय, कोणती वापरायची, त्यापैकी कोणते भाग वापरायचे याची निश्चिती संपादकांमध्ये चर्चा व एकमत वापरून, प्रत्येक लेखासाठी केली जाते.
माहितीचौकटी काय करतात
संपादनमाहितीचौकटीत अनेक महत्त्वाची तथ्ये व सांख्यिकी समाविष्ट असते. त्याचा प्रकार त्यासंबंधित किंवा त्या-सम सर्व लेखात सारखा असतो. उदाहरणार्थ, सर्व प्राण्यांमध्ये वैज्ञानिक वर्गीकरण (जसे-वंश, कुळ इत्यादी) तसेच संवर्धन स्थिती इत्यादी.प्राणीसंबंधी लेखात {{जीवचौकट}} साचा लावल्याने,अशा प्रकारची माहिती त्वरीत मिळविणे व तसेच,इतर लेखांतील माहितीशी त्या माहितीस ताडणे सोपे होते.माहितीचौकटी ह्या एखाद्या मासिकातील तथ्ये दर्शविणाऱ्या कडपट्टी (साईडबार)सारख्या असतात.त्या कोणत्याही महत्त्वाच्या बाबींचा सहज वाचता येण्याजोगा सारांश देतात.तरीही, त्या सांख्यिकींची सारणी अथवा तक्ता नाहीत, ज्यात एखाद्या लेखाचा सारांश दिला असतो.त्यातील माहिती ही लेखामध्ये मुख्य मजकूर म्हणून काही भागात दिलीच असते कारण सर्व वाचकांना माहितीचौकटीतील माहितीस पोहोच नसू शकते.विशेषतः जेंव्हा माहितीचौकटी त्यातील माहितीचे मोठे स्तंभ निपतन सारणीमध्ये लपवितात,वाचन सहाय्य तंत्रज्ञान वापरणाऱ्या वाचकांना ते पूर्णपणे अनुपलब्ध राहू शकतात.
अनेक माहितीचौकटी ह्या मायक्रोफॉर्मॅटसारखा मेटाडाटा प्रसृत करतात.(the microformats project बघा).
माहितीचौकटीत काय असावे?
संपादनसामान्यतः, माहितीचौकटीत खालील माहिती असावी:
- ताडण्याजोगी. जर अनेक वेगवेगळ्या विषयांत जर एकच सूत्र असेल (उदाहरणार्थ, सर्व लोकांना/व्यक्तींना नाव व जन्मतारीख असते), तर, त्यांना अनेक पानांमध्ये ताडल्या जावयास शक्य व्हावे.याचाच अर्थ असा कि, जेथे शक्य असेल तेथे, मजकूर हा एका प्रमाणित रूपात प्रस्तुत करण्यात यावा.
- संक्षिप्त.माहितीचौकट साचे हे "एकाच दृष्टीक्षेपात" याप्रमाणे असतात. त्यांचा वापर तथ्ये त्वरीत तपासण्यासाठी होतो.
- मजकूराचे दृष्टीने माहितीचौकटी त्या विषयाशी संबंधित असाव्यात
- त्याचा संदर्भ लेखात कुठेतरी असावा. माहितीचौकटीत, प्राथमिकरित्या तो मजकूर असावा जो, लेखात योग्य स्रोतांचे संदर्भ देऊन (लेखाची प्रस्तावना) विस्तृतपणे मांडल्या गेला असावा.तरीही, जर आवश्यक असेल तर, (उदा.:कारण तो लेख सध्या अपूर्ण आहे) माहितीचौकटीत तळटिपा देणे शक्य आहे.
माहितीचौकटीत काय नसावे?
संपादनसामान्यतः, माहितीचौकटीत काय माहिती नसावी:
- अनावश्यक लांबी. खूप मोठा मजकूर किंवा खूप तपशिलवार सांख्यिकी ही लेखाचे मायन्यात असते.
- क्षुल्लक तपशिल. एक सामान्य समस्या अशी आहे कि, माहितीचौकटीत क्षुल्लक तपशिल टाकणे, जो, लेखात कधीही अंतर्भूत केल्या जाऊ शकत नाही:उदाहरणार्थ, एखाद्या काल्पनिक पात्राचा रक्तगट हा लेखात संदर्भांकित असावा, पण तो विषय समजण्यास मदत करीत नाही. माहितीचौकट साचे हे लेखात न देतायेण्याजोग्या खूपच क्षुल्लक अशा माहितीसाठी वापरण्यात येऊ नये. (यास काही अपवादही आहेत-जसे रासायनिक गुणधर्म )
- ध्वज. ध्वज चिन्हे माहितीचौकटीत वापरण्यात येऊ नयेतnot be used. जरी त्यात देश अथवा राष्ट्रीयत्व हे क्षेत्र/प्राचल असेल तरीही.ते ध्वज त्यामुळे विनाकारण इतर क्षेत्रांपेक्षा ठळकपणे दिसतात.त्यामुळे इतर क्षेत्रे लपली जातात.
माहितीचौकट एखाद्या लेखात जोडणे
संपादनमाहितीचौकट एखाद्या लेखात जोडावयाच्या दोन पद्धती आहेत:
- माहितीचौकट शोधणे
- लेखाचे/पानाचे संपादन करणे
एखादी विशिष्ट माहितीचौकट शोधणे
संपादनलेखात एखादी माहितीचौकट वापरण्यासाठी, संपादकास त्या चौकटीचे नाव व प्राचले माहित हवीत.तसेच ती प्राचले कशाप्रकारे वापरावीत याची माहिती हवी. कारण माहितीचौकटी ह्या लेखांपासून वेगळ्या नामविश्वात ठेवल्या जातात.एखादी माहितीचौकट नावानिशी शोधण्यासाठी थोडे कष्ट पडतात.संपादकास नाव मिळाले तर, मग सरळ त्या माहितीचौकटीचे दस्तावेजीकरण तो बघु शकतो.
एखादी माहितीचौकट शोधून वापरण्याचे संपादकापाशी दोन मार्ग आहेत:
- विकिपीडिया:माहितीचौकटींची यादी यामार्फत माहितीचौकटींचा संच न्याहाळून.
- त्यासारख्याच एखाद्या लेखात वापरलेल्या माहितीचौकटीचे नाव शोधून.
उदाहरणार्थ: लेख [[]]मध्ये एक माहितीचौकट आहे.ती कोणती हे बघण्यासाठी त्या लेखाची 'संपादन कळ'(स्रोत संपादित करा') ही टिचका.
{{Infobox connector ... }}
संकेत "{{Infobox connector
" यावरुन त्या माहितीचौकटीचे नाव कळू शकेल.साचा नामविश्वातील Template:Infobox connector हे पान बघून, या माहितीचौकटीचे दस्तावेजीकरण बघुन, व त्यात कोणती प्राचले आहेत ते त्यास कळू शकेल.
लक्ष्य लेखाचे संपादन
संपादनWikipedia's Manual of Style नुसार, माहितीचौकटी ह्या व सुचालन खूणपताका यांचे वरील बाजूस असावयास हव्यात.
माहितीचौकटीच्या दस्तावेजीकरण पानात, सहसा, एक कोरा साचा राहतो.त्यास हव्या असलेल्या लेखात नकल-डकव करता येते. त्या साच्यात उघडणारी अशी दोन महिरपी कंस चिन्हे(डबल ब्रेसेस) राहतात ({{
) व बंद होणारी दोन महिरपी चिन्हे (}}
). त्यामधील जागेत, माहितीचौकटीचे नाव, व प्राचलांची यादी राहते.त्यात प्राचलांची 'किंमत'(व्हॅल्यू) टाकली रहात नाही.संपादक मग त्यात बरोबरच्या खूणेच्या (=) उजव्या बाजूस प्रत्येक प्राचलाची माहिती भरतो
उदाहरणार्थ:
{{माहितीचौकट व्यक्ती |नाव = |चित्र = |चित्रशीर्षक = ... |संकेतस्थळ = }}
वरील माहितीस खालील प्रकारे भरता येऊ शकते:
{{माहितीचौकट व्यक्ती |नाव = Casanova |चित्र = Casanova_self_portrait.jpg |चित्रशीर्षक = A self portrait of Casanova ... |संकेतस्थळ = }}
या उदाहरणात,माहितीचौकट तयार करतेवेळी प्राचलांची नावे ("नाव
", "चित्र
", "चित्रशीर्षक
", "संकेतस्थळ
") ही निश्चित केलेली आहेत व त्याचे वर्णन दस्तऐवज पानात (/doc पानात) केले आहे. एखाद्या प्राचलात टंकनचूक/अथवा चुकीचा शब्द, शब्दरचना,अथवा तो मूळ माहितीचौकटीसारखा नसल्यास अथवा तत्सम एखादी चूक झाल्यास तो प्राचल अजिबात दर्शविल्या जात नाही.कोणती प्राचले सक्रिय आहे हे शोधण्यास,माहितीचौकटीचे साचा पान बघावे.तेथे ज्याची नोंद नाही (व तसे एखाद्या इतर माहितीचौकटीत असेल तरीही), त्याकडे दुर्लक्ष होते. जर आपणास असे वाटते कि माहितीचौकटीत एखादे प्राचल सुटले आहे व/किंवा एखादे त्यात जोडावयाचे आहे,तर तसे त्या साच्याच्या चर्चापानावर सूचवा.माहितीचौकटीच्या दस्तावेजीकरण पानात कोणते प्राचल हे आवश्यक आहेत व कोणते ऐच्छिक आहेत हे दर्शविलेले असते.आवश्यक प्राचले ही, झलक बघतांना किंवा जतन केल्यावर, तिन महिरपी कंसात दर्शविल्या जातात (उदाहरणार्थ:{{{requiredparametername}}}
) ऐच्छिक प्राचले ही रिकामी ठेवल्या जाऊ शकतात किंवा त्यांना थेट वगळल्या जाऊ शकते.
समस्यानिवारण
संपादनजर आपण एखादी माहितीचौकट लेखात टाकली व ती नीट दिसत नाही,तर खाली संभाव्य त्रुटींची माहिती दिली आहे, ते तपासून बघावे:
- आपण एखादा स्वतः तयार केलेला अथवा अवैध प्राचल वापरला आहे.या माहितीचौकट साच्यात आपण फक्त तेच प्राचल वापरू शकता जे साच्यात 'प्रोग्राम' केल्या गेले आहेत.
- आपण प्राचलाचा चुकीचा शब्द टाकला अथवा आवश्यक विरामचिन्हे वापरली नाहीत.उदाहरणार्थ,
birth_place
) या प्राचलात 'अंडरस्कोअर' न वापरता, त्यास थेटbirth place
) असे टाकले. - आपण प्राचलाचे नाव ठळक अथवा कॅपिटलाईज्ड केले. प्राचले ही 'केस सेन्सेटिव्ह' असतात.बहुदा सर्वच माहितीचौकटीत 'लोअर केस'चे शब्द वापरण्यात येतात.
- आपण चित्राच्या आधी
File:
किंवाचित्र:
असे टाकले.(किंवा आपण तसे टाकलेच नाही व साच्याची तशी आवश्यकता आहे.) - आपण एकाच प्राचलाचे नाव एकापेक्षा जास्त वेळा वापरले.आपण सर्वात शेवटी टाकलेलेच नाव व माहिती दृश्य होईल.
माहितीचौकटीत चित्र जोडणे
संपादनimage
व caption
ही प्राचले वापरून चित्रे चौकटीत नमूद केल्या जातात. तरीही, एखाद्या माहितीचौकटीत वेगळ्या नावाची प्राचले असू शकतात, उदाहरणार्थ,साचा:Tp मध्ये"image" ऐवजी"Cover"शब्द वापरला आहे तर "caption" ऐवजी "Caption".
image
या प्राचलाला कधीकधी विकिपीडिया:Extended image syntax लागतो;इतर वेळी त्यास फक्त चित्रसंचिका नाम हवे.हे सर्व ती माहितीचौकट तयार करणाऱ्यावर अवलंबून असते. एखाद्या संपादकास, त्यावर प्रयोग करून ('झलक पहा' ही क्रिया वापरून) किंवा त्या साच्याचे दस्तावेजीकरण तपासून त्यास निर्णय घेता येतो.
चित्र बघु न शकणाऱ्या लोकांसाठी,माहितीचौकटीत असणाऱ्या चित्रांमध्ये special text alternative असावयास हवा.
माहितीचौकट तयार करणे
संपादनमाहितीचौकट साच्याचे आरेखन तयार करण्यापूर्वी,एखाद्या इतर संपादकाचे मत घेणे अथवा असलेल्या माहितीचौकट साच्यासच सुधारणे ही एक चांगली कल्पना आहे.त्यापैकी अनेक आवश्यकता ह्या एखाद्या त्याप्रकारच्या साच्यात असतातच. उरलेल्या आवश्यकता,ह्या काही प्रमाणात त्या साच्याची मोडतोड करून व बदलवून मिळविता येऊ शकतात.विनाकारण करण्यात आलेली साच्याची द्विरुक्ती ही पसारा तयार करणे व लेखात भेद निर्माण करणे होय.आपला आद्यनमूना (प्रोटोटाईप) हा आपल्या सदस्यपानावरuser space अथवा धूळपाटीवर तयार करा.एकदा आद्यनमूना तयार केल्यावर,आपले बदल हे योग्य त्या विकिप्रकल्पावर प्रस्तावित करा.आपण तयार केलेल्या नविन आरेखनाचा तो साचा साचा नामविश्वात दाखल करण्यापूर्वी,त्यावर एकमत प्राप्त करा.
माहितीचौकट वगळणे
संपादनएखादी माहितीचौकट वगळण्याची विनंती ही आधी विकिपीडिया:चर्चेत असणारे साचे यावर तसेच, योग्य त्या संलग्न विकिप्रकल्पांवर टाकून, तेथे लक्ष वेधावयास हवे.एखाद्या साच्यास तो पूर्णपणे वगळण्याऐवजी त्याचे इतर साच्यात विलिनीकरण करता येऊ शकते.
हेही बघा
संपादनसाचा:Wikipedia glossary/विकिपीडिया शब्दार्थसंग्रह
- विकिपीडिया:How to read a color infobox
- विकिपीडिया:How to read a taxobox
- विकिपीडिया:Thinking outside the infobox
- विकिपीडिया:सहाय्य मेज – to ask questions about using infoboxes in articles if you weren't able to find the information you need on this help page.
- विकिपीडिया:Disinfoboxes – an essay expressing a particular viewpoint
- सहाय्य:माहितीचौकट § Notes