सव्हाना (इंग्लिश: Savannah) हे अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यामधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर व तिसऱ्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे. सव्हाना शहर जॉर्जियाच्या पूर्व भागात साउथ कॅरोलायना राज्याच्या सीमेवरील सव्हाना नदीच्या मुखाजवळ व अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. ब्रिटिशकालीन साम्राज्यात असताना सव्हाना जॉर्जिया प्रांताची राजधानी होती. येथील ऐतिहासिक वास्तूशास्त्रासाठी प्रसिद्ध असलेल्या सव्हानामध्ये अनेक जुन्या इमारती व चर्चे आहेत. ह्यांसाठी सव्हानाला जॉर्जियाच्या पर्यटन नकाशावर मानाचे स्थान आहे.

सव्हाना
Savannah
अमेरिकामधील शहर
सव्हाना is located in जॉर्जिया (अमेरिका)
सव्हाना
सव्हाना
सव्हानाचे जॉर्जिया (अमेरिका)मधील स्थान
सव्हाना is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
सव्हाना
सव्हाना
सव्हानाचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 32°4′52″N 81°5′28″W / 32.08111°N 81.09111°W / 32.08111; -81.09111

देश Flag of the United States अमेरिका
राज्य जॉर्जिया
स्थापना वर्ष इ.स. १७३३
क्षेत्रफळ २८१.५ चौ. किमी (१०८.७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४९ फूट (१५ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर १,३६,२८६
  - घनता ८२३.६ /चौ. किमी (२,१३३ /चौ. मैल)
  - महानगर ३,४७,६११
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
savannahga.gov


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: