सलमा हायेक हिमेनेझ (सप्टेंबर २, इ.स. १९६६:कोत्झाकोआल्कोस, बेराक्रुथ, मेक्सिको - ) ही मेक्सिकन-अमेरिकन चित्रपट अभिनेत्री, दिग्दर्शक आणि निर्माती आहे. हायेकने पहिल्यांदा मेक्सिकोमध्ये दूरचित्रवाणीमालिकांमध्ये अभिनय केला. डेस्पराडो, डॉग्मा आणि वाइल्ड वाइल्ड वेस्ट या चित्रपटांतील तिच्या भूमिका प्रसिद्ध झाल्या. हायेकने २००२ साली फ्रिडा या चित्रपटात फ्रिडा काह्लोची भूमिका वठवली. यासाठी तिला ऑस्कर पुरस्कार मिळाला.

सलमा हायेक
Salma Hayek 2, 2012.jpg
सप्टेंबर ८, २०१२ रोजी दॉव्हिल पुरस्कार समारंभात सलमा हायेक
जन्म २ सप्टेंबर, १९६६ (1966-09-02) (वय: ५५)
कोत्झाकोआल्कोस, बेराक्रुथ, मेक्सिको
अपत्ये व्हॅलेंटिना पालोमा पिनॉ