सर्व शिक्षा अभियान
६ ते १४ वयोगटातील बालकांना उपयुक्त व योग्य प्राथमिक शिक्षण देऊन (२०१० पर्यंत ) 'शिक्षणाचे सर्वत्रीकरण करणे 'सर्व शिक्षा अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे , शालेय व्यवस्थापनात समाजाचा सहभाग घेऊन ' शिक्षणातील सामाजिक,प्रादेशिक व लैंगिक भेद दूर करणे ' हेही सर्व शिक्षा अभियानाचे उद्दिष्ट आहे . २००९ मधील शिक्षण हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व शिक्षा अभियानाची उद्दिष्ट्ये आणखी वाढवली ती म्हणजे ' प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे ' कायद्याच्या अंलबजावणीच्या पर्यवेक्षणासाठी सुविधा उभारणे ' कायद्याच्या प्रसारासाठी राष्ट्रीय प्रसार कार्यक्रमांचे आयोजन करणे इ .शिक्षकांच्या अध्यापन व निरंतर शिक्षणासाठी १९९५ मध्ये शिक्षक अध्यापन राष्ट्रीय परिषद स्थापना झाली .सर्व शिक्षा अभियानातील शिक्षक प्रशिक्षणासाठी ही परिषद महत्त्वाची भूमिका बजावत आहे ,
सर्व शिक्षा अभियानाची वैशिष्टये
१) वैश्विक प्राथमिक शिक्षणासाठीची विशिष्ट चौकट
२) दर्जेदार शिक्षणाच्या मागणीला दिलेला प्रतिसाद
३) मूलभूत शिक्षणात सामाजिक न्यायास प्रोत्साहन देण्याची संधी
४) पंचायतराज संस्था ,समाज आणि संघटनांचा सहभाग घेऊन विकेंद्रीकरणास प्रोत्साहन देणारी योजना
५) वैश्विक प्राथमिक शिक्षणासाठीच्या राजकीय इच्छाशक्तीचे प्रकटीकरण
६ )केंद्र ,राज्य व स्थानिक प्रशासनातील दुवा
७) राज्यांना त्यांच्या शिक्षणविषयक कल्पनांना वाव देणारे व्यासपीठ
८) शिक्षणाचा हक्क मिळवून देण्याचे साधन
सर्व शिक्षा अभियानात खालील गोष्टी राबविल्या जातात.
१) शाळा उपलब्ध नसलेल्या अधिवासांमध्ये शाळा उभारणे .
२) शाळांमध्ये पायाभूत सुविधा करणे , जसे वर्गखोल्या उभारणे ,पिण्याच्या पाण्याच्या व स्वचतेच्या सुविधा उभारणे , देखरेख व सुधारणेसाठी
आर्थिक मदत पुरविणे
३) अतिरिक्त शिक्षक पुरविणे , शिक्षकांना प्रभावी प्रशिक्षण देऊन त्यांच्या क्षमतेत वाढ करणे .
४) शैक्षणिक साहित्य विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे ,पाठयपुस्तके , गणवेश पुरविणे
५) जीवनकौशल्ये विकसित होतील असे प्राथमिक शिक्षण देणे
६) मुलींच्या शिक्षणावर तसेच विशेष गरजा असलेल्या बालकांच्या शिक्षणावर विशेष लक्ष्य पुरविणे . समावेशीत शिक्षण उपक्रमांतर्गत विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग मुलांना सर्वसामान्य समवयस्क मुलांसोबत शिक्षण दिले जाते. [१]
७) संगणकाचे प्रशिक्षण देणे