समशीर्षकी साहित्यकृती

समशीर्षकी साहित्यकृती म्हणजे ज्या साहित्यकृतींच्या शीर्षकांमध्ये फरक नाही किंवा खूप कमी फरक आहे अशा साहित्यकृतीं. थोडक्यात एकाच नावाच्या अनेक कलाकृती असे होय.

  1. शीर्षक हे तंतोतंत समान (अभिन्न)
    1. साहित्यप्रकार समान
    2. साहित्यप्रकार भिन्न
  2. शीर्षक भिन्न पण भेद किमान
    1. शीर्षकार्थ समान (उदाहरणार्थ: डोळा/डुळा)
    2. शीर्षकार्थ भिन्न (उदाहरणार्थ: वाहे/वाजे)
  1. युगांत ( इरावती कर्वे , महेश एलकुंचवार )
  2. रूपवेध ( नरहर कुरुंदकर , श्रीराम लागू )
  3. जागर ( नरहर कुरुंदकर , शिवाजीराव भोसले )
  4. मृद्गंध ( विंदा करंदीकर , इंदिरा संत )
  5. ययाती ( विस खांडेकर , गिरीश कार्नाड )
  6. एल्गार ( श्रीना पेंडसे , सुरेश भट )
  7. मृण्मयी ( गोनी दांडेकर , इंदिरा संत )
  8. मध्यान्ह ( भगवंत क्षीरसागर , भारती बिर्जेडिग्गीकर )
  9. समिधा ( कुसुमाग्रज , साधना आमटे , रणजित देसाई )
  10. रेघोट्या ( प्रतिभा रानडे , विश्वास वसेकर )
  11. रणांगण ( विश्राम बेडेकर , विश्वास पाटील )
  12. मुसाफिर ( बशीर बद्र , संपा. अरुण टिकेकर , अच्युत गोडबोले )
  13. कॕलिडोस्कोप ( अच्युत बर्वे , निखिल वागळे )
  14. किमयागार ( सदाशिव अमरापूरकर , अच्युत गोडबोले )
  15. प्रेमाची गोष्ट ( श्याम मनोहर , सतीश राजवाडे )
  16. समुद्र ( वसंत दत्तात्रेय गुर्जर - कविता, परेश मोकाशी - नाटक , मिलिंद बोकील - कादंबरी व नाटक , मराठी सिनेमा )
  17. अजून येतो वास फुलांना ( मर्ढेकर , )
  18. तारांगण ( सुरेश द्वादशीवार , )
  19. जास्वंद ( माधव आचवल , विजया राजाध्यक्ष )
  20. नागमंडल ( गिरीश कर्नाड , संपा. अरुणा ढेरे )
  21. शोधयात्रा (अरुण साधू , जयंत वष्ट , अनंत देशमुख )
  22. संधिकाल (मधु मंगेश‌ कर्णिक , काप्रा /माधवराव घोरपडे)
  23. ज्याचा त्याचा प्रश्न ( प्रिया तेंडुलकर , अभिराम भडकमकर )
  24. महाश्वेता ( सुमती क्षेत्रमाडे , सुधा मूर्ती )
  25. संहिता ( विंदा करंदीकर , सुमित्रा भावे )
  26. उत्खनन ( गौरी देशपांडे , जयश्री हरि जोशी )
  27. वारा वाजे/हे रुणझुणा ( चिंत्र्यं खानोलकर , श्रीवि कुलकर्णी )
  28. त्रिशंकू ( चिंत्र्यं खानोलकर , अरुण साधू )
  29. तिसरा डोळा ( अनिल बर्वे,हेमंत जोगळेकर,किरण येले 'डु',विनया देसाई )
  30. अवघा रंग एक झाला ( जनाबाई - किशोरी आमोणकर , मीना नेरूरकर)
  31. सरींवर सरी (बाभ बोरकर, संदीप खरे,गायक-विनायक जोशी , गजेंद्र अहिरे )
  32. बया दार उघड ( गोनी दांडेकर , सुषमा देशपांडे)
  33. वामांगी ( अरुण कोलटकर , दिनकर मनवर )
  34. निवडुंग ( चित्रपट-शंना नवरे,कथा-आशा बगे,नाट्य-शशिकांत लावणीस)
  35. रातराणी ( विजय तेंडुलकर , प्रल मयेकर )
  36. मैना खेर ( विजय तेंडुलकर , वैशाली पंडित )
  37. पारध ( जगदीश गोडबोले , काका विधाते )
  38. समांतर ( सुहास शिरवळकर , अमोल पालेकर )
  39. केतकरवहिनी ( उमा कुलकर्णी , द.दि.पुंडे )
  40. अभयारण्य ( नरहर कुरुंदकर , जयंत नारळीकर )
  41. सत्तांतर ( व्यंकटेश माडगूळकर , गोविंद तळवलकर )
  42. अॉर्फियस ( जीए कुलकर्णी , दिपु चित्रे )
  43. अठरा धान्यांचे कडबोळे ( श्रीकृ कोल्हटकर , विद्युल्लेखा अकलूजकर )
  44. हिंदू (भालचंद्र नेमाडे , शरणकुमार लिंबाळे )
  45. गोलपिठा ( नामदेव ढसाळ , सुरेश चिखले )
  46. उत्तरायण ( हेमंत जोगळेकर , शिवाजी साटम )
  47. मन्वंतर ( दिनानाथ मनोहर , सुरेश द्वादशीवार )
  48. रातवा ( मारुती चितमपल्ली , चंद्रकांत नलगे )
  49. चक्र ( जयवंत दळवी , विद्याधर पुंडलीक )
  50. ताम्रपट ( देबाशिष मुजुमदार अनु. अरविंद देशपांडे , रंगनाथ पठारे )
  51. दिवस असे की ( प्रवीण बर्दापूरकर , संदीप खरे )
  52. जिव्हार ( रवींद्र दामोदर लाखे , भालचंद्र कुलकर्णी )
  53. एका श्वासाचं/चे अंतर (अंबिका सरकार , सुबोध नेमळेकर )
  54. शोध ( नारायण धारप , मुरलीधर खैरनार )
  55. प्रतिसृष्टी ( ध्रुव भट अनु. अंजनी नरवणे , संजय आर्वीकर )
  56. आरण्यक ( विभूतिभूषण बंद्योपाध्याय-अनु.शंबा शास्त्री,अनु.जयंत कुलकर्णी,रत्नाकर मतकरी , सुरेंद्र दरेकर )
  57. पानिपत ( त्र्यंशं शेजवलकर , विश्वास पाटील , आशुतोष गोवारीकर )
  58. हृदयस्थ ( अलका मांडके , अशोक चिटणीस )
  59. अजून चालतोचि वाट/अजून चालतेचि वाट ( ए.पा. रेंदाळकर, वि.भि.कोलते. आनंदीबाई विजापुरे)
  60. स्वामी ( रणजित देसाई, गिरीश कर्नाड, मनोज बाजपेयी )
  61. झुंड ( दत्ता मोरसे, समर खडस, नागराज मंजुळे )

संदर्भ

संपादन