समर्थ रामदासकृत दखनी उर्दू पदावल्या
समर्थ रामदासकृत दखनी उर्दू पदावल्या हे समर्थ रामदास यांनी दखनी उर्दू भाषेत केलेल्या पदावल्यांचे पुस्तक आहे. मनीषा बाठे यांनी लिहिलेल्या या पुस्तकात समर्थ रामदासांनी देशभरात केलेली भ्रमंती, त्यांना असलेले अनेक भाषांचे ज्ञान आदी पैलू मांडले आहेत.
यात इ.स. १६३२ ते १६४४ या काळात समर्थांनी लिहिलेल्या ३०० दखनी उर्दू पदावल्या यात अर्था आहेत. मुसलमानी अष्टक हा त्यांचा अजून एक ग्रंथ आहे. त्यांच्या या ग्रंथातील ९९ पदावल्या हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठीच्या आहेत. समर्थांच्या दखनी उर्दू भाषेत एकूण १८ बोली भाषांचा समावेश होता. त्यातील १३ भाषांशैलींत समर्थांनी पदावल्या लिहिल्या.
अमराठी युवकांसाठी त्यांनी समाज परिवर्तनाची स्फूर्तिगीते लिहिली होती. देशभरात त्यांनी ११०० मठ स्थापन केले होते. त्यांची आणि गुरू हरगोविंदसिंग यांची भेट झाली होती.[ संदर्भ हवा ]
या ग्रंथाची वैशिष्ट्ये -
१. समर्थ रामदास यांनी देशभरात स्थापन केलेल्या अकराशे मठांचा नकाशा ग्रंथात समाविष्ट केला आहे.
२. समर्थांच्या हस्तलिखिताचा फोटो
३. २१ मठाधिपतींचे चित्र