समर्थ पंचायतनात समर्थ रामदासस्वामी, जयरामस्वामी वडगावकर, रंगनाथ स्वामी निगडीकर, आनंदमूर्ती, आणि केशवस्वामी यांचा समावेश होतो. याबद्दलचा एक श्लोक असा आहे :-

श्रीरामदास जयराम रंगनाथ।
आनंदमूर्ति केशव सनाथ।।
ऐसे हे पंचायतन समर्थ।
रामदासस्वामींचे॥१॥

हे दिसताती वेगळाले।
परी ते स्वरूपी मिळाले॥।
अवघे मिळोनि येकच जाले।
निर्विकारवस्तु॥२॥

समर्थ रामदास सोडल्यास या बाकी चौघांचे आडनाव कुलकर्णी होते.