मराठी लेख

संपादन

अशिन्तोष,

आपली सूचना योग्य आहे. लेखांच्या गुणवत्तेला महत्त्व जरूर आहे परंतु अधिकाधिक लेख (नावापुरते का होईना) विकिपिडीया वर असले तर नवीन (किंवा जुन्याही) सदस्यांना त्यांबद्दल अधिक माहिती द्यावीशी वाटेल असा माझा अंदाज आहे. जर नवीन लेख सुसंबद्ध असतील, जसे भारताच्या राज्यातील सगळ्या जिल्ह्यांविषयीचे लेख, तर एखाद्याला आपण राहात असलेल्या शहर/जिल्ह्याविषयी दोन वाक्ये लिहावीशी वाटतील. नवीन लेख सुरू करून लिहीण्यापेक्षा हे नक्कीच सुकर आहे.

शिवाय, जर असे लेख लिहीले जाउन त्यांची मांडणी सुसंबद्ध असली तर भावी लेखकांसाठी ते प्रमाण होईल.

गुणवत्तापूर्ण लेख लिहीणे कधीही चांगलेच. आशा आहे आपल्याकडूनही (पूर्वीप्रमाणेच) अजून लेख लिहीले जातील.

क.लो.अ.

अभय नातू 05:58, 8 मे 2006 (UTC)

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

संपादन

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.