ळख

महानुभाव पंथ महाराष्ट्रात उगम पावलेला असून त्याचा प्रसार उत्तर भारतात पंजाब आणि काश्मीरपर्यंत झाला. उत्तरेकडे या संप्रदायाला जयकृष्णी पंथ म्हटलं जातं. आजही उत्तर भारतात या संप्रदायाचे आश्रम व महंत आहेत. या संप्रदायाच्या समाजावादी व चातुर्वर्ण्य विरोधी विचारसरणीमुळं मोठय़ा प्रमाणात अनुयायी लाभले. महानुभाव संप्रदायाचे तेरा आम्नाय आहेत. कवीश्वर आम्नाय हा त्यांतील एक होत. मुरारी बास हे याच आम्नायातले आहेत. तत्त्वाचिंतनात्मक लेखन हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. ग्रंथावर भाष्य-महाभाष्य लिहिली गेली. भाष्यलेखनाची परंपरा व्यापक, प्रदीर्घ व भाष्य-लेखन - सातत्य टिकविणारी आहे. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक व अवतारस्वरुप श्री चक्रधरस्वामी यांनी बाराव्या तेराव्या शतकात आपल्या संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाची वैशिष्ट्य सूत्र रुपानं 'दृष्टान्तपाठ' या ग्रंथात सांगितली. या ग्रंथावरील भाष्यं अनेक महानुभाव संतकवींनी व भाष्यकारांनी केली. हा इतिहासही महानुभाव साहित्याचं वेगळपण सिद्ध करणारा आहे. याच भाष्यलेखनमालिकेतील मुरारीबासांचा 'दृष्टान्तप्रबोध' हा ग्रंथ होय. या संप्रदायातील अनेक भाष्यकार संस्कृतज्ञ विद्वान आणि त्यांनी आपले भाष्यग्रंथ स्वामींच्या आदेशानुसार लोकभाषेतून मराठीत लिहिले आहे. अवतार

श्रीकृष्ण, दत्तात्रेय, चक्रपाणी, गोविंदप्रभू, चक्रधरस्वामी मुख्य उपदेश

एकेश्वरभक्ती, मूर्तिपूजा नाही, चरणांकित स्थान पूजा, अहिंसा, शाकाहार, अस्पृश्यता न पाळणे वगैरे. कार्य

श्री चक्रधर स्वामी : महानुभाव पंथ :भगवान श्री चक्रधर स्वामी सेवा समिती नेरी बु॥ प्रमुख व्यक्ती

   केशिराज बास
   नागदेवाचार्य
   गोविंद प्रभू अर्थात गुंडम राऊळ,

महानुभव पंथाचे अभ्यासक

महानुभपंथीय हा सर्वात जुन्या पंथा पैकी असलातरी राजकीय आक्रमकांच्या आक्रमणात त्यांचे साहीत्य पुन्हा पुन्हा नष्ट होण्याचे प्रसंग आले त्यामुळे संगोवांगी लीळां मिळवून पूर्नलेखानचे प्रय्त्न झाले त्यातील कोणत्या लीळा मूळाहेत आणि शिवाय त्यांचा मोठा जाणतावर्ग संन्यस्त असल्यामुळे पंथेतर साहीत्यीकांनी संशोधन केले ते संशोधन खऱ्या पंथ श्रद्धांशी जूळत नाही असा आक्षेप पंथीयनी कालौघात घेतला. विष्णू भिकाजी कोलते यांची अग्रगण्य महानुभाव साहित्य संशोधक म्हणून परिचय होता पण नंतरच्या काळात पंथ संप्रदायाच्या लोकांनी त्यांचे काही मुद्यांवरचे लेखन अमान्य असल्याचे मांडले. चरणांकीत तीर्थस्थाने

   पिंगळभैरव देवस्थान, अचलपूर
   वटेश्वर निद्रास्थान वडनेर-भुजंग
   सर्पद्वयपतन स्थान वडनेर-भुजंग
   वाळकेश्वर मंदिर, पातूर
   उत्तरेश्वर मंदिर, आलेगाव
   वाळकेश्वर मंदिर, आलेगाव
   काटेशुक्रमबाबा संस्थान, काकडा
   अष्टमासिद्धी देवस्थान
   बारा घोडा स्थान - रिद्धपुर
   भैरव बुरुज स्थान - रिद्धपूर
   भिंगार जिल्हा अहमदनगर

प्रमूख धार्मीक/ अध्यात्मीक ग्रंथ

   भग्वद्गीता
   श्रीमदभगवदगीता - पंथाचा आद्य ग्रंथ समजला जातो.
   लीळाचरित्र - पंडित माईमभट्ट श्री चक्रधर स्वामींचे जीवन चरित्र
   रुक्मिणी स्वयंवर - श्री नरेंद्र भट्ट (१२९२)
   शिशुपाल वध - भास्कर भट्ट बोरीकर (१३१२)
   उद्धवगीता - भास्कर भट्ट बोरीकर (१३१३)
   साय्ह्याद्रीवर्णन - रावळोबास (१३५३)
   रिद्धपूर वर्णन - नारायणबास (१४१८)
   वच्छहरणं - दामोधर पंडित (१३१६)
   ज्ञानप्रबोध - विश्वनाथ बालापुरकर (१४१८)

Start a discussion with Anantpatil

Start a discussion
Return to the user page of "Anantpatil".