सदस्य चर्चा:अभय नातू/नो ओपन प्रॉक्सीझ

Active discussions

खालील मजकूर मीडियाविकिच्या नियमावलीतून घेतलेला आहे.


हे धोरण ओपन प्रॉक्सीझ[मराठी शब्द सुचवा](खुल्या प्रातिनिधिक )वरून मराठी विकिपीडियावरील संपादनांना बंदी घालण्याबाबत आहे. हे धोरण विकिमीडियाच्या सार्वत्रिक धोरणावर आधारित आहे. याबद्दल फेब्रुवारी २००४मध्ये चर्चा झाली होती आणि हे धोरण मार्च २००६मध्ये अमलात आणले गेले.

जर तुम्ही अशा ओपन प्रॉक्सीवरील प्रतिबंधनाने प्रभावित असाल तर मराठी विकिपीडियाच्या प्रचालकांशी संपर्क साधा.

धोरणसंपादन करा

ओपन प्रॉक्सी किंवा आयपी अंकपत्ता बदलणाऱ्या प्रॉक्सी सर्व्हरांवर[मराठी शब्द सुचवा](प्रातिनिधिक विदागार) कोणत्याही क्षणी कितीही काळ प्रतिबंधन घातले जाऊ शकते. असे करण्याने मराठी विकिपीडियावरील निर्दोष सदस्य प्रभावित होण्याची शक्यता असली तरीही या बंदीचा रोख त्यांच्यावर नाही. अशा बंदी घातल्या गेलेल्या प्रॉक्सी सर्व्हरांद्वारे मराठी विकिपीडियावरील मजकूर वाचण्यास कोणतीही बंदी किंवा मज्जाव नाही.

अशा प्रॉक्सी अनवधानाने खुल्या ठेवल्या जातात. अनेकदा ही कृती हॅकरद्वारे सर्व्हरच्या मालकाच्या माहितीशिवाय केली जाते. कधीकधी ही कृती मुद्दामहून खोडसाळपणा करण्यासाठीही केली जाते. अस्थानीय (नॉन-स्टॅटिक) आयपी अंकपत्ते असलेले प्रॉक्सी सर्व्हर किंवा अनवधानाने खुल्या असलेल्या प्रॉक्सी कायमच्या प्रतिबंधित करू नये. एखाद्या सर्व्हरवरील खुली प्रॉक्सी बंद केल्याची खात्री झाल्यावर त्याच्या अंकपत्यावरील बंदी हटविण्यात यावी.

अपवादसंपादन करा

जरी एखाद्या आयपी अंकपत्यावर प्रतिबंध असला तरीही लेखन करता येऊ शकते. यासाठी अशी प्रॉक्सी वापरणाऱ्या सदस्याने इतर अंकपत्यावरून प्रचालकांशी संपर्क साधावा. अशा वेळी प्रचालक त्या लेखकाचे योगदान तपासून पाहतील व खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्तींपैकी हा लेखक नसल्याची खात्री झाल्यावर त्यास अंकपत्ता प्रतिबंधन सूट देतील.

अनेकदा संपादक आपल्या न्याहाळकातील सेटिंगची[मराठी शब्द सुचवा] माहिती नसल्याने अनवधानाने खुल्या प्रॉक्सीझ वापरीत असतात, तरी अशी सूट मिळण्याची विनंती करण्या आधी आपल्या न्याहाळकातील आंतरजाल कनेक्शन प्रेफरन्स[मराठी शब्द सुचवा](आंतरजाल अनुबंध पसंतीक्रम) बघावेत आणि त्यातील प्रॉक्सी वापरण्याची मुभा काढून टाकावी.


मूळ वाक्य सुचविलेले वाक्य
हे धोरण विकिमीडियाच्या सार्वत्रिक धोरणावर आधारित आहे. हे बंदी घालण्याचे धोरण विकिमीडियाच्या सार्वत्रिक धोरणावर आधारित आहे
जर तुम्ही अशा ओपन प्रॉक्सीवरील प्रतिबंधनाने प्रभावित असाल तर जर तुम्ही केलेली संपादने अशा प्रतिबंधनाने बाधित झाली असतील तर
कोणत्याही क्षणी कितीही काळ प्रतिबंधन घातले जाऊ शकते कोणत्याही क्षणी कितीही काळासाठी बंदी घातली जाऊ शकते
असे करण्याने मराठी विकिपीडियावरील निर्दोष सदस्य प्रभावित होण्याची शक्यता असली तरीही या बंदीचा रोख त्यांच्यावर नाही. अशा बंदीचा रोख विकिपीडियाच्या निर्दोष सदस्यांवर नसला, तरी बंदीमुळे त्यांची काही संपादने प्रभावित होऊ शकतील
अशा प्रॉक्सी अनवधानाने खुल्या ठेवल्या जातात अशा प्रॉक्सी जाणूनबुजून खुल्या ठेवल्या जातात./चुकून खुल्या राहतात
अनवधानाने खुल्या असलेल्या प्रॉक्सी कायमच्या प्रतिबंधित करू नये. जाणूनबुजून खुल्या ठेवलेल्या/अनवधानाने खुल्या राहिलेल्या प्रॉक्सी कायमच्या प्रतिबंधित करू नयेत.
खात्री झाल्यावर त्यास अंकपत्ता प्रतिबंधन सूट देतील. खात्री झाल्यावर त्याच्या अंकपत्त्यावरचे प्रतिबंधन काढून टाकतील.
मीडियाविकी हे सॉफ्टवेर वापरले जाते. मीडियाविकी हे सॉफ्टवेअर वापरले जाते.
असे व्यक्ती स्वयंचलित स्क्रिप्ट वापरून अशा व्यक्ती स्वयंचलित स्क्रिप्ट वापरून
सतत आयपी अंकपत्ते बदलत गोंधळ घालीत असतात, आयपी अंकपत्ते पुन्हापुन्हा बदलून गोंधळ घालीत असतात,/सतत बदलतात व गोंधळ घालतात
आम्ही हे धोरण अंगिकारले आहे. आम्ही हे धोरण अंगीकारले आहे.

....J (चर्चा) १९:२७, ३ मे २०१२ (IST)

Return to the user page of "अभय नातू/नो ओपन प्रॉक्सीझ".