खरे तर मला या ठिकाणी माझी ओळख करून द्यायची नव्हती. कारण स्वत:बद्दल जास्त काही बोलायला मला आवडत नाही. फक्त गूगल वर जाऊन "Tushar Kute" नावाने सर्च करा तुम्हाला सगळी माहिती मिळेल. शिक्षण पाहायचे झाले, तर मी एक कंप्यूटर इंजिनियर आहे. मातृभाषेतून शिक्षण झाल्याने मराठी हा माझा जिव्हाळ्याचा विषय. शिवाय याच मातृभाषेने मला ज्ञानाधिष्ठित बनविले. तीची सेवा करण्यासाठी मी येथे उपस्थित आहे... इतकेच. प्रत्येकजण मला निरनिराळ्या नजरेतून पाहतो.....

  • माझे सी व जावाचे विविध प्रोग्राम्स ईटरनेटवर पाहणाऱ्यांसाठी मी एक प्रोग्रामर आहे.
  • माझ्या विद्यार्थ्यांसाठी मी एक शिक्षक आहे.
  • माझे लिनक्स व ओपन सोर्सवरील प्रेम पाहणाऱ्यांसाठी मी एक सच्चा लिनक्सप्रेमी आहे.
  • माझे ब्लॉग वाचणाऱ्यांसाठी मी एक ब्लॉगर आहे.
  • माझे लेख व पुस्तके वाचणाऱ्यासाठी मी एक लेखक आहे.
  • मला किल्ले फिरताना पाहणाऱ्यांसाठी मी एक शिवभक्त व ट्रेकर आहे.
  • माझे टेक्निकल ब्लॉग वाचणाऱ्यांसाठी मी एक टेक्निकल रायटर आहे.
  • माझे फोटो पाहणाऱ्यांसाठी मी एक फोटोग्राफर आहे.
  • माझे विविध भाषांतील योगदान पाहणाऱ्यांसाठी मी एक भाषातज्ज्ञ आहे.
  • माझ्या कथा वाचणाऱ्यांसाठी मी एक कथाकार आहे.
  • माझ्या कविता वाचणाऱ्यांसाठी मी एक कवी आहे.
  • माझे हिंदी ब्लॉग्ज वाचणाऱ्यांसाठी मी एक हिंदीप्रेमी आहे.
  • माझे भारतीय संगीतावरील प्रेम पाहणाऱ्यांसाठी मी एक संगीततज्ज्ञ आहे.
  • पण, खरं सांगू का मित्रांनो मी मराठीवर प्रेम करणारा साधा मराठी माणूस आहे...!!!