.बाळकृष्ण महादेव भोसले यांचा जन्म १२ जुलै १९२६ रोजी पोम्बुर्फा बार्देश येते झाला. त्यांच्या वडिलांचे नाव महादेव भोसले होते. त्यांचे मराठी प्राथमिक आणि इंग्रजी माध्यमिक स्थरावर शिक्षण झाले. काही काळ त्यांनी ब्रिटीश सैनात सेवा केली आणि दुसरे महायुद्ध संपले तेव्हा १९४५ मध्ये स्वेच्छेने निवृत्त झाले.मोहन रानडे यांच्या प्रभावाने सप्टेंबर १९५४ मध्ये ते आझाद गोमंतक दल मध्ये सामील झाले आणि त्यांनी उत्तर गोवा जिल्ह्यातील पोम्बुर्फा , एकोशी , चोडण, मायेम आणि अल्डोना गावात भूमिगत काम केले. आझाद गोमंतक दलाच्या वतीने २७ मे १९५५ रोजी अल्डोना पोलीस स्टेशनवर तसेच १८ जून १९५५ रोजी चोडणचे पोर्तुगीज समर्थक आणि ३० जुने १९५५ रोजी दारुगोळा लुटण्यासाठी पाली खाणीसारख्या अश्या अनेक धाडसी हल्ल्यांमध्ये भाग घेतला. त्यानंतर गोवा लिबरेशन आर्मीमध्ये सामील झाले आणि ५ फेब्रुवारी १९५६ रोजी चोडण येते पोर्तुगीज पोलिसांवर झालेल्या हल्यात सहभागी झाले.५ डिसेंबर १९५६ रोजी माधवराव राणे, सोमा रामा मलिक, रघुनाथ पुंडलिक शिरोडकर , शिवलिंग भोसले, बाबुराव मलिक परब, रंगा शिरोडकर, राया शिरोडकर आणि प्रभाकर कालेकर यांचासह  पोम्बुर्फा पोलीस स्टेशनवर हल्ला केला.

\

संदर्भ सूची


१ Shirodkar, DR.P.P ed. Who’s who of freedom fighters.vol.1 The executive editor and member secretary, goa gazetteer department of goa, daman and diu panaji december 1986


461