स्त्रियांचे अश्लिल प्रदर्शन प्रतिबंधक कायदा संपादन

अश्लिल आणि मानहानीकारक स्त्रियांचे प्रदशर्न घडविणाऱ्या जाहिराती ,प्रकाशन ,लिखाण,पेंटिंग,चित्रकला,सिनेमा किवा इतर कोणत्याही प्रकारे स्त्रियांचे अश्लिल प्रदर्शन करणारा हा कायदा आहे .

सदर कायदा हा केंद्र सरकारने पारित केलेला आहे .

  • कलम २ नुसार जाहिरात वितरण महिलांचे अश्लिल प्रदर्शन ,लेबल इ. शब्दांची व्याख्या दिलेली आहे .
  • कलम ३ नुसार अश्लील् आणि मानहानीकारकरित्या स्त्रियांचे प्रदर्शन ,स्त्री शरीराच्या कोणत्याही अवयवाचे प्रदर्शन कोणत्याही पद्धतीने घडविण्याला प्रतिबंध केला आहे .
  • कलम ४ नुसार अशा लिखाण ,चित्र ,पेंटिंग ,फिल्म व इतर कोणत्याही प्रकार वापरून त्याचे वितरण करण्याला बंदी घालण्यात आली आहे .सिनेमेताग्रफी १९५२ हा देखील या कायद्या सोबतच फिल्म्सला लागू करण्यात आला आहे .
  • कलम ५ नुसार प्राधिकृत करण्यात आलेल्या राजपत्रित अधिकाराला शोध घेण्याच आणि जप्तीचा अधिकार दिला आहे .
  • कलम ६ नुसार या कायद्याचा भंग करणारा व्यक्ती ,संस्था ,कंपनी ,त्यांचे पदाधिकारी ,लेखक ,चित्रकार ,कॅमेरामन ,तंत्रज्ञ इत्यादी वर कारवाई केली जाऊ शकते .
  • कलम ७ नुसार कलम ३ आणि ४ चा भंग करणार्यांना २ वर्षे सक्त मजुरी आणि रुपये 2000/- पर्यंत दंड आणि दुसर्यांदा गुन्हा घडल्यास ५ वर्ष सक्त मजुरी आणि १००००/- ते ५००००/- दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
  • कलम ८ नुसार सदर गुन्हे हे दखल पात्र आणि जामीन पात्र आहेत .
  • कलम ९ नुसार कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यात आले आहे .
  • कलम १० नुसार असणारे नियम पुढील प्रमाणे : - नियम २,३,४,५ मध्ये संबंधित अधिकाऱ्याने कारवाई करून संबंधित जाहिरात कायद्यात दिलेल्या विहित नमुन्यात नोंदवून सर्व आर्टिकल्स, साहित्य शोधमोहिमे मध्ये जप्त करून, पंचनामा करून, कोर्ट समोर कसे दाखल करावे या बाबतचे नियम देण्यात आले आहेत .